शरद पवार-अजितदादांच्या भेटीवर फडणवीसांचे कानावर हात; म्हणाले, मला जर..
Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. काल पुण्यात एका उद्योजकाच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, कोणत्या कारणामुळे दोघांची भेट झाली याचा काहीच तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र या घडामोडींवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीसंदर्भात मला काहीच माहिती नाही. त्यांची भेट कधी झाली, किती वेळ झाली याची माहिती माझ्याकडे आजिबात नाही. मला अशी माहिती मिळाली तर मी तुम्हाला नक्की सांगतो असे फडणवीस म्हणाले.
शरद पवारांकडून अजितदादांना ‘इंडिया’ बैठकीचं निमंत्रण? गुप्त भेटीवर राऊतांचं वेगळचं लॉजिक
शरद पवार- अजिततदादा का भेटू शकत नाहीत – राऊत
शरद पवार-अजित पवारांच्या भेटीचं माध्यमांतून ऐकलं. अद्या दोन्ही नेत्यांनी यावर भाष्य केलेलं नाही. नवाज शरीफ आणि मोदी भेटू शकतात. मग अजित पवार आणि शरद पवार का भेटू शकत नाहीत, असा सवाल करत यावर शरद पवार येत्या दोन ते तीन दिवसात बोलतील असे कळल्याचे राऊत म्हणाले. कदाचित इंडियाच्या बैठकीला सामील होण्यासाठी शरद पवारांनी अजित पवारांना निमंत्रण दिलं असेल. बाकी काय असणार आहे असा टोला राऊत यांनी लगावला.
राजकारणात काहीच गुप्त राहत नाही. काहीही घडू शकतं. पहाटेच्या शपथविधीप्रमाणे परत फिरा आणि 31 ऑगस्टच्या इंडिया आघाडीच्य बैठकीत सहभागी व्हावे. सध्याच्या महाराष्ट्र सरकारमध्ये कुणीही खुश नाही. राजकारणात उलथापालथ होईल असं बोललं जात आहे. त्याची दुसरी बाजू आहे. ते ही लवकरच कळेल असे राऊत म्हणाले.