Download App

मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? तटकरेंनी सांगितलं नेमकं काय ठरलं

Image Credit: letsupp

Cabinet Expansion : अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांसह राज्य सरकारमध्ये दाखल झाले. त्यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या आमदारांना वजनदार खातीही मिळाली. शिंदे गटातील आमदार मात्र कोरडेच राहिले. आता शिंदे-फडणवीस-पवार सराकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) कधी होणार, या प्रश्नाचे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज सायंकाळी कोल्हापुरात सभा होत आहे. त्याआधी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तटकरे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्वाची माहिती दिली.

शिवसेनेची काँग्रेस होणार नाहीच, हिंदुत्व दाखवूनच देतो; ठाकरेंनी भाजपला ठणकावलं!

गणेशोत्सवापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार आणि पालकमंत्रीपदाचे वाटप (Cabinet Expansion) होईल. मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन नवीन मंत्री आणि पालकमंत्री हे गणेशोत्सवापूर्वी संपूर्ण राज्यात स्थिरावलेले आपल्याला पाहण्यास मिळतील, अशी माहिती तटकरे यांनी दिली. ते पुढे म्हणाले, कोल्हापूरचे पालकमंत्री कोण असतील याचा अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आहे. पण, एक सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांवर पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात येईल.

ते पुढे म्हणाले, आम्ही मंत्रिमंडळात सहभागी झालो तेव्हाच राष्ट्रवादी काँग्रेसला पालकमंत्रीपद देण्याचे निश्चित (Cabinet Expansion) झाले होते. मंत्रिमंडळाचा विस्तार अजून व्हायचा राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना देखील वेगवेगळ्या जिल्ह्यांची पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात येईल. राष्ट्रवादीला किती यापेक्षा आम्ही एकत्रित काम करण्यावर भर दिला आहे. यासंदर्भात येथे चर्चा करण्यापेक्षा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्रित बसून काय तो निर्णय घेतील. पालकमंत्री पदावरून कोणताच वाद होणार नाही. आम्ही सर्व एकाच दिशेने चाललो आहोत. जितके मंत्री आहेत तितकी पालकमंत्रीपदे मिळतील, असे तटकरे म्हणाले.

जसं जालियनवाला बाग काडं झालं, तसं ‘जालन्या’वाला घडवला; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात

शिंदे गटाचं काय ?

अजित पवार सरकारमध्ये सहभागी होण्याआधीपासून राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Cabinet Expansion) चर्चा सुरू होत्या. शिंदे गटातील आणखी काही आमदांना राज्यात आणि केंद्रात मंत्रीपदे मिळतील असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात मात्र अजित पवार सरकारमध्ये आले. त्यांच्या आमदारांना मंत्रीपदेही मिळाली. मात्र, शिंदे गटाचे आमदार तसेच राहिले. आता तटकरे यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून राष्ट्रवादीला ठरल्याप्रमाणे मंत्रीपदे मिळतील असे सांगितले आहे. मग, आता शिंदे गटाचे काय होणार, अशा चर्चा राज्याच्या राजकारणात जोरात सुरू झाल्या आहेत.

Tags

follow us

वेब स्टोरीज