Download App

सत्तार बोलायला पटाईत : संगमनेरच्या घोड्याचा लगाम दिला विखे पाटलांच्या हाती

अहमदनगर : जिल्ह्यातील शिर्डी येथे देशातील सर्वात मोठे पशुधन एक्स्पोचे (Mahapasudhan Expo) आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांनी केलेलं एक वक्तव्य चांगलेच चर्चेत राहिले. महापशुधन एक्स्पोत संगमनेरचा घोडा दिसला आणि त्याचा लगाम मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हाती पाहिला. यावेळी सत्तार म्हणाले, घोडा कुठलाही असो पण लगाम विखे पाटलांकडे असतो. असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

शिर्डी येथे तब्बल 46 एकरात देशातील सर्वात मोठी महापशुधन एक्सपो 2023 चे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणी महसूलमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अब्दुल सत्तार बोलत होते.

घोडा कुठलाही असो, त्याचा लगाम मात्र विखे पाटलांकडे
यावेळी बोलताना सत्तार म्हणाले, या महापशूधन एक्सोपत विविध प्रकारच्या गायी व घोडेही आहेत. यामध्ये संगमनेरी घोडे असल्याचे मला प्रथमच समजले. पण घोडा कुठलाही असो, त्याचा लगाम मात्र विखे पाटलांकडे असतो. यावेळी माजी महसूलमंत्री तसेच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता त्यांना देखील शाब्दिक टोला लगावला. ते म्हणाले, संगमनेरच्या घोड्याचीही लगाम त्यांच्याच हातात आहे. लगाम धरता येतो त्यांनीच घोडा खरेदी करावा. आपल्या जी लगाम धरता येत नाही, ती लगाम धरण्याचे काम विखे पाटील चांगल्या पद्धतीने करतात, असेही सत्तार यावेळी म्हणाले.

भाजपा आमदार म्हणाल्या…तुम्ही म्हणता हे शेतकऱ्यांचे सरकार मात्र इथं बळीराजा मदतीपासून वंचित

दरम्यान या कार्यक्रम सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरुन बोलतांना कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, विखे पाटील आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे माझे पाठीराखे आहेत. आपल्या राजकीय जडणघडणीत या दोघांची महत्वाची भूमिका आहे. तसेच मी मंत्री होणार ही विखे पाटलांची भविष्यवाणी खरी ठरली आणि शपथविधीला जाण्यासाठी हेलिकॉप्टरही त्यांचेच होते. मी म्हणजे प्रासंगिक करार, वेळ प्रसंग पाहून निर्णय घेतो, असे सत्तार म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले… म्हणून श्रीमंतांच्या यादीत माझे नाव येणार नाही, मात्र…

मात्र, विखे पाटील महाएवस्पो प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, की सिल्लोड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत विखे पाटील यांनी ‘माझ्या मंडळाला विजयी करा, सत्तार मंत्री होतील,’ असे जाहीर केले. त्यांची भविष्यवाणी खरी ठरलो. अवघ्या आठ दिवसांत मी मंत्री झालो. शपथविधीला जाण्यासाठी त्यांचेच हेलिकॉप्टर होते. अशा शब्दात त्यांनी आपल्या राजकीय प्रवासात विखेंचे महत्व देखील स्पष्ट केले.

Tags

follow us