भाजपा आमदार म्हणाल्या…तुम्ही म्हणता हे शेतकऱ्यांचे सरकार मात्र इथं बळीराजा मदतीपासून वंचित

भाजपा आमदार म्हणाल्या…तुम्ही म्हणता हे शेतकऱ्यांचे सरकार मात्र इथं बळीराजा मदतीपासून वंचित

मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यातच अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर सभागृहात चर्चा देखील झाल्या. यातच भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांनी आपल्या मतदार संघातील नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहिल्याचा प्रश्न सभागृहात मांडला. विशेष म्हणजे सत्ताधारी सरकारची टॅगलाईनचा उच्चार करत त्या म्हणाल्या तुम्ही म्हणता हे शेतकऱ्यांचे सरकार आहे मात्र इथे बळीराजा नुकसान भरपाईपासूनच वंचित असल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक विषयांवर चर्चा झाल्या. तसेच यावेळी लोकप्रतिनिधी आपापल्या मतदार संघातील प्रश्नांबाबत सभागृहात लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. यातच सध्या अवकाळीमुळे बळीराजाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. या मुद्द्यावरून देखील सभागृहात चर्चा झाली. याच अनुषंगाने शेवगाव – पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा मुद्दा सभागृहात मांडला.

Rahul Gandhi Press Conference Highlight : काँग्रेस नेते राहुल गांधीच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख १० मुद्दे

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ऑगस्ट ते ऑक्टोबर 2021 मध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली होती. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तसेच अनेक ठिकाणी प्रशासन पंचनाम्यासाठी जाऊ शकली नाही. त्यामुळे माझ्या मतदार संघातील 16 ते 17 हजार शेतकरी हे आर्थिक मदतीपासून वंचितच राहिले आहे.

अहमदनगर शहरातील मस्जिदीच्या जागांवर अतिक्रमण होतंय…अबू आझमींनी उपस्थित केला सवाल

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी वारंवार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री यांना विनंती केली आहे. तुम्ही जर म्हणता हे शेतकऱ्यांचे सरकार आहे हे गतिमान सरकार आहे तर माझी अशी अपेक्षा आहे की माझ्या मतदार संघातील वंचित राहिलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत तातडीने जाहीर करण्यात यावी अशी मागणी यावेळी भाजप आमदार मोनिका राजळे यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube