राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यात राजकीय संघर्ष आहे. तर भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी भगवान गडावर राजकीय दसरा मेळावा घेऊ दिला नाही. त्यामुळे शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात संघर्ष झाला आहे. अनेकदा हे संघर्ष टोकाला गेला आहे. परंतु आता मात्र या तिघांचे मने जुळून येत असल्याचे एका सप्ताहातून दिसून आले. तिघे केवळ एकत्र आले नाहीत. तर तिघांनी आपल्या मनातील भावनाही बोलून दाखविल्या आहेत.
आमच्यावेळी मर्यादा, सुसंस्कृत पणा होता… आतासारखी टोकाची भूमिका नव्हती!
पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथे नारळी सप्ताहाची सांगता भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या किर्तनाने झाली. मात्र या नारळी सप्ताहाला पंकजा मुंडे, धनंजय मुंडे ही उपस्थित होते. नामदेव शास्त्री म्हणाले, पंकजाताईचे आणि माझे काही वैर नाही, मी राजकारणी माणूसही नाही. तिला मी मुलगी म्हणून घोषित केले. तिच्याविरोधात मी कसा जाईल. पंकजाताईने अहंकार कमी करावा व स्वाभिमान ठेवावा आपण कोणाचे तरी ऐकले पाहिजे कोणाल तरी जीवनामध्ये मानले पाहिजे. धनंजय मुंडे बाबत धनंजय व पंकजा या दोघांचेही आयुष्य खूप चांगले आहे. दोघेही मुंडे घराण्याचे आहे.
त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी भगवानगडाचे विरोधात कसलेही भाष्य केले नाही. येथून पुढच्या काळातही मी गडाविरोधात कसलाही पद्धतीचे बोलणार नाही. भगवान बाबा आमच्या हृदयामध्ये आहे. मी भगवानगडाची पायरी आहे.
पुण्यातील ट्रॅफिक पोलिसांचा शनिवारवाड्यापुढे सत्कारच करायला हवा… : हरी नरकेंना दाखवला खाक्या
त्यानंतर धनंजय मुंडे म्हणाले की, मी एक भगवान गडाचा भक्त असून आमची आई भगवानगडाची वारकरी आहे. भगवान बाबा कित्येक वेळा आमच्या घरी येत असत त्यामुळे मी भगवानगडाला कधीच विसरू शकत नाही व मी भगवानगडाच्या पायरीचा दगड आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांनी गडावरती होणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलीच्या मंदिरासाठी 21 लाख रुपये देणगी कबूल केली. यावेळी या सप्ताहासाठी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आपली उपस्थिती दर्शविली आहे.