Download App

“कोरोना लसीमुळे लोकांना रक्तदाब, हृदयविकाराचा त्रास”; प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप

Image Credit: Letsupp

Praniti Shinde on Corona Vaccine : लोकसभा निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. यानंतर आता राजकीय पक्षांत आरोप प्रत्यारोप वाढले आहेत. यातच आता काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी (Praniti Shinde) वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मोदींच्या पक्षाला 100 कोटी रुपये दिले म्हणूनच सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसींचं कंत्राट (Corona Vaccine) मिळालं असा गंभीर आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला. इतकेच नाही तर या कोव्हिड लसीमुळे अनेकांना शुगर, रक्तदाब आणि हृदयविकाराचा त्रास सुरू झाला त्यामुळेच मी लस घेतली नाही, असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या.

Praniti Shinde : बड्या कंत्राटदारांना महाराष्ट्र विकण्याचं भाजपचं षडयंत्र; प्रणिती शिंदेचं टीकास्त्र

लोकसभा निवडणुकांची घोषणा (Lok Sabha Election) झाली आहे. त्यामुळे नेतेमंडळींनी मतदारांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनीही एका गावभेटीदरम्यान हे वादग्रस्त वक्तव्य केले. त्या पुढे म्हणाल्या, मोदी सरकारने उपकृत केलेल्या 80 टक्के कंपन्यांनी भाजपला निवडणूक रोख्यांच्या (Electoral Bonds) रुपात मदत केली. कोरोना काळात मोदी सरकारने पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या कोव्हिड 19 लस खरेदी केल्या.

लोकांना दोन-दोन मात्रा बळजबरीने टोचल्या. पंतप्रधान मोदी (PM Modi) यांचे फोटो असलेले प्रमाणपत्रही दिले. या लसी खरेदी केल्याची परतफेड म्हणून कंपनीने शंभर कोटींचे रोखे खरेदी केले. मात्र ही कोविड मात्र लोकांचे आयुष्य मारून टाकण्यासाठीच होती की काय अशी शंका येते. कारण, ज्या लोकांना लसी घेतल्या त्यांना तर रक्तदाब, हृदयविकार असे दुखणे सुरू झाले.

 मी ‘ते’ रेकॉर्डवर आणू शकत नाही; प्रणिती शिंदेंकडून चव्हाणांच्या राजीनाम्याची पोलखोल

follow us

वेब स्टोरीज