‘मी ‘ते’ रेकॉर्डवर आणू शकत नाही’; प्रणिती शिंदेंकडून चव्हाणांच्या राजीनाम्याची पोलखोल

‘मी ‘ते’ रेकॉर्डवर आणू शकत नाही’; प्रणिती शिंदेंकडून चव्हाणांच्या राजीनाम्याची पोलखोल

Praniti Shinde On Ashok Chavan : भाजपकडून माईंड गेम खेळलं गेलंय ते मी रेकॉर्डवर आणू शकत नसल्याचं म्हणत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या राजीनाम्याची पोलखोल केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळख असलेले अशोक चव्हाण यांनी आपल्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवला आहे. चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच आता प्रणित शिंदे यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

भारतीय सैन्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर, चित्रपटावरून पुण्यात राडा…

प्रणित शिंदे म्हणाल्या, भाजपने ईडीची (ED) भीती दाखवल्याने अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. वारंवार छापा आणि प्रेशर टाकून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी हा निर्णय घेतला आहे. भाजपने ईडीची भीती दाखवल्याने अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेससाठी दुर्दैव गोष्ट आहे. पण ही भाजपचे तंत्रच आहे, प्रेशर आणि ब्लॅकमेल केलं जातं असल्याचा आरोप प्रणित शिंदे यांनी केला आहे.

अजितदादांनी हेरला लोकसभेचा प्रमुख शिलेदार : धनंजय मुंडेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

भाजपचा माईंड गेम…
अशोक चव्हाण यांनी सध्या काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे. ते पुढे काय करणार हे आता त्यांनी सांगितलेलं नाही. अशोक चव्हाण यांचे वडील मुख्यमंत्री होते. चव्हाण यांच्या पत्नी आमदार होत्या त्यांच्याशी देखील माझं बोलणं झालं. त्यांच्यात असलेलं स्ट्रेस लेव्हल आणि ज्या पद्धतीने भाजपकडून माइंड गेम खेळलं गेलं ते मी रेकॉर्डवर आणू शकतं नाही. पण अतिशय हताश होऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे. अजूनही काँग्रेसमधील अनेक नेत्यांना त्रास देणे सुरूच आहे, हे असलं राजकारण देशात पहिल्यांदाच होत असल्याचं प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत.

मला वेगळा पर्याय शोधायचा – चव्हाण
मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदाराकीचा राजीनामा दिला आहे. आपली पुढील राजकीय भूमिका येत्या एक दोन दिवसात जाहीर करणार आहे. पक्ष सोडताना तसं कोणतंही कारण नाही, प्रत्येक गोष्टीचं कारण सांगता येणार नाही असं सांगत त्यांनी मला वेगळा पर्याय शोधायचा आहे, म्हणून राजीनामा दिला असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज