Praniti Shinde : कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपुरमध्ये आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी यावेळी कंत्राटी भरती आणि शाळांच्या खाजगी कंपन्यांना देण्याच्या मुद्द्यावर टीका केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्या बोलत होत्या.
काय म्हणाल्या प्रणिती शिंदे?
पत्रकारांनी यावेळी प्रणिती यांना खासगीकरणावर प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, मला एक धक्कादायक गोष्ट कळाली जेव्हा मी एका शिक्षकांच्या कार्यक्रमाला गेले होते. तेथील एक शिक्षक म्हणालें की, कदाचितही आणची शेवटची पीढी असेल. कारण शाळांचं खासगीकरण झालं आहे. हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. तर भाजप अशाप्रकारे गोरगरिबांचा आरक्षणाचाही हक्क हिरावून घेत आहे. अशी टीका त्यांनी यावेळी केली.
श्नी नवलमल फिरोदिया लॉ कॉलेजचे मध्यस्थी वादापूर्वी आणि वादानंतर नाटक गाजले !
पुढे प्रणिती शिंदे म्हणाल्या की, भाजपने सहा बड्या कंत्राटदारांना महाराष्ट्र विकला आहे. त्यामुळेच बिंदुनामावली रद्द होणार आहे. त्याचबरोबर आरक्षण देखील रद्द होणार आहे. मात्र सरकारच्या या षडयंत्राच्या विरोधात आम्ही आवाज उठवला आहे. तसेच त्यांनी ज्या ठराविक लोकांना हे कंत्राट आणि खासगीकरण सोपवलं आहे हे धक्कादायक आहे.
69 th National Film Awards सोहळ्यातील क्षणचित्रांवर एक नजर टाकूयात…
दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यामध्ये राज्यातील कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी म्हणजे नाना पटोले यांनी राज्यामध्ये आढावा बैठका घेण्याचे आयोजन केले आहे. त्या अंतर्गत प्रणिती शिंदे यांनी देखील त्यांच्या मतदारसंघामध्ये अशा बैठका घ्यायला सुरूवात केली आहे. यावेळी त्यांनी पंढरपुरमध्ये बैठक घेतली.