कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे एक निसर्गप्रेमी असल्याचं दिसून येत आहे. आमदार रोहित पवारांनी जाखमेडच्या पुढारी वडाबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत झाडाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेक युजर्सने कमेंटही केल्या आहेत. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी काही दिवसांपूर्वीच तोडण्यात आलेल्या पुढारी वडाच्या खोडाचं विंचरणा नदीकाठी पुनर्ररोपण करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुढारी वडाच्या खोडाचं नदीकाठी पुनर्ररोपण केलं होतं.
श्री सदस्यांचे मृत्यू सरकारने घडवून आणलेत; आव्हाडांचा सरकारवर गंभीर आरोप
आमदार पवार पोस्टमध्ये म्हणाले, जामखेडमधील अनेक राजकीय घडामोडींचं साक्षीदार असलेलं आणि पुढारी_वड म्हणून प्रसिद्ध असलेलं वडाचं झाड रस्ता रुंदीकरणासाठी अत्यंत जड अंतःकरणाने काढावं लागलं, पण विंचरणा नदीकाठी केलेलं त्याचं यशस्वी पुनर्ररोपण आणि आज त्याला फुटलेली कोवळी पालवी पाहताना खूप आनंद होत असल्याचं ते म्हणाले आहेत.
राज्य सरकारचा मोठा निर्णय, दिव्यांगासाठी पदोन्नतीत 4 टक्के आरक्षण…
दरम्यान, जामखेडच्या पुढाऱ्यांचा कट्टा म्हणून या वडाच्या झाडाची ओळख आहे. तालुक्यातल्या ग्रामपंचायत सदस्य असो अथवा नगरपरिषदेचा नगराध्यक्ष असो याचं ठिकाणा आपल्या कार्यकर्त्यासमेवत पुढारी वडाखाली असलेल्या चहाच्या कट्ट्यावर खलबतं करीत असत.
सीमाभागात प्रचारासाठी पक्षाच्या नेत्यांना पाठवू नका; एकीकरण समितीकडून काँग्रेस-भाजपला पत्र
मात्र, राष्ट्रीय महामार्गासाठी झाडाचा बळी द्यावा लागला आहे. राष्ट्रीय महामार्गासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांची आणि अतिक्रमणे शासनाकडून हटवण्यात आली. त्यामुळे पुढारी वडाचा नाहक बळी द्यावा लागला. काही दिवसांपूर्वीच रस्त्याच्या रुंदीकरणासाठी पुढारी वडावर हातोडा मारण्यात आला होता.
Thane Fire : ठाण्यात दोन इमारतींना भीषण आग, 10 तासांनंतर आग आटोक्यात
भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या वडाची पूजा करुन वडाचे खोड व्यवस्थित काढून घेतले. त्यानंतर वडाचे झाड आठवणीत राहावे म्हणून याची लागवड केली जाणार होती, पण ते खोड दोन-तीन दिवस त्याच ठिकाणी राहिले.
अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 18 फेब्रुवारी 2023 रोजी हे खोड उचलून जवळच असणाऱ्या विंचरणा नदीच्या काठावर लावले. आता पुन्हा एकदा या खोडाला फुटलेली कोवळी पालवी पाहताना खूप आनंद होत असल्याचं आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, सध्या खोडाला कोवळी पाने फुटली आहेत, पुढील काळात हे झाडं पुन्हा एकदा जामखेडकरांना सावली देण्यासाठी बहरणार आणि पुन्हा इथं राजकीय खलबतं रंगणार हे मात्र, नक्की.