Download App

Pune Loksabha : पुण्याची जागा भाजपचीच! बापटांनंतर मोहोळांच्या हाती कमान, धंगेकरांचा पराभव

पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकरांचा एक लाखांच्या लीडने पराभव केलायं.

Image Credit: Letsupp

Pune Loksabha : पुणे लोकसभा मतदारसंघ (Pune Loksabha) हा भाजपचाच असल्याचं मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी सिद्ध करुन दाखवलं आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल आज हाती आला असून पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी महाविकास आघाडीचे उमदेवार रविंद्र धंगेकरांना (Ravindra Dhangekar) चारीमुंड्या चीत केलंय. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ 1 लाख 18 हजार मतांनी विजयी झाले आहेत. मोहोळ यांना एकूण 5 लाख 49 हजार 21 मते मिळाली असून रविंद्र धंगेकरांना 4 लाख 36 हजार 379 मताधिक्य मिळालंय. तसेच वंचितचे वसंत मोरे यांच्या पदरात अवघे 30 हजार 914 मते पडली आहेत. या तिरंगी लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं अखेर मोहोळ यांनी विजय मिळवत गिरीश बापटानंतर पुण्याची कमान सांभाळणार असल्याचा सूर पुणेकरांकडून आवळण्यात येत आहे.

राज्यातील दोन्ही राजे लोकसभेत! उदयनराजेंनी वचपा काढला तर कोल्हापुरकरांचंही छत्रपतींच्या गादीलाच मत

लोकसभेत मिळालेल्या विजयानंतर मुरलीधर मोहोळ म्हणाले, मी पुणेकरांचे आभार मानत असून पुणेकरांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पुण्याला देशातील सर्वोत्तम शहर करण्यासाठी प्रयत्न करणार असून मला कोणावरही टीका करायची नाही काही जणांनी कोथरूडमध्ये लीड घेईल, अशी वर्गणी केली मात्र, मी कसब्यातच लीड घेतला. भाजपमध्ये सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळतो, हे मी माझ्या अनुभवावरून सांगत असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलंय.

Elections Results : नाशिक, जळगाव, नंदूरबार अन् धुळ्यात कुणाची आघाडी? वाचा एका क्लिकवर…

पुणे लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. दिवंगत माजी खासदार गिरीश बापट पुण्याचे तत्कालीन खासदार होते. गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्याच्या जागेवर पोटनिवडणूक होणार असल्याचं समोर आलं होतं. मात्र, आता थेट प्रत्यक्षात निवडणूकच पार पडली. मोहोळ यांच्याआधी गिरीश बापट यांनी पुणे मतदारसंघ राखून ठेवला होता. आता त्यांच्यानंतर मुरलीधर मोहोळ हा गड राखणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, मोहोळ महापौर असतांनाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन झालं. तेव्हापासून सातत्याने ते विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ते लोकांसमोर येत राहिले. मुरलीधर मोहोळ हेच लोकसभेसाठीचे उमेदवारी असतील, अशी चर्चा त्यानंतर सुरु झाली होती. तसेच मोहोळ हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचे पक्षातील निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. इतर पक्षांच्या नेत्यांशीही त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते, त्यामुळेच त्यांना भाजपकडून लोकसभेसाठी संधी देण्यात आली. अखेर मोहोळ यांनी विजय मिळवून भाजपच्या विश्वासाला पात्र ठरले असल्याचं बोललं जात आहे.

follow us

वेब स्टोरीज