Download App

‘स्टंटबाजी करू नका’; श्रीरामपूर बंद ठेवणाऱ्यांना राधाकृष्ण विखेंनी सुनावले !

  • Written By: Last Updated:

Radhakrishna Vikhe : शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची घोषणा केल्यानंतर जिल्हा विभाजनाची मागणी पुढे आली आहे. जिल्हा विभाजन करून श्रीरामपूर (Shrirampur) मुख्यालय करण्याची मागणी आहे. या मागणीसाठी शनिवारी श्रीरामपूर शहर बंद ठेवण्यात आले होते. त्यात माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे (Karan Sasane) यांच्यासह सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. त्यावरून आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी श्रीरामपूरमधील नेत्यांना जोरदार सुनावले आहे. (radhakrishna-vikhe-speak-on-shrirampur-leader)

विखे म्हणाले, श्रीरामपूरच्या नेत्यांनी इतके वर्षे स्टंटबाजी केली. त्यामुळेच श्रीरामपूरचे वाटोळे झाले आहे. स्टंटबाजी करूनच अनेक उद्योग बाहेर घालवले आहेत. ज्यावेळी मुळा-प्रवरा संस्था गेली. त्यावेळी या नेत्यांनी स्टंटबाजी केली नाही. त्यावेळी श्रीरामपूर बंद केले नाही, असा आरोपही केला आहे.

मोठी बातमी : मनिषा कायंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी, खासदार विनायक राऊतांची माहिती

प्रवरेच्या पाण्यावर अशोक कारखान्याची सुबत्ता झाली म्हणून दोन लाख टन ऊस बाहेरच्या कारखान्याला जाऊ शकला नाही. काहीजण विनाकारण काहीतरी स्टंटबाजी करून तालुक्याचे वाटोळे करीत आहेत. शेती महामंडळाच्या जमीन वाटपात अनेकांनी घोटाळे केल्याचा आरोपही विखे यांनी केला आहे.

SIT करणार बोगस बियाणांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दापाश; मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता>
काही डॉक्टरांनी कोरोनामध्ये चांगली कमाई करत नाशिकमध्ये हॉटेल घेतले. माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे. आपल्याकडे आहे, कोणी काय काय उद्योग केले, हे एक दिवस सांगू, असाही इशारा विखे यांनी दिला आहे.

त्यातच श्रीरामपूर जिल्ह्यासाठी आवश्याक असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उत्तर विभाग कार्यालय संगमनेर येथून श्रीरामपूर येथे स्थलांरित करावे, संगमनेरचे प्रस्तावित उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रद्द करावे, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय श्रीरामपूर येथे मंजूर करावे, या मागण्यांसह श्रीरामपूर जिल्हा व्हावा, या मागणीचे निवेदन भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विखेंना दिले आहे.

Tags

follow us