पंढरपूर : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आज (रविवार) पंढरपूर येथे झालेल्या राष्ट्रीय सर्वसाधारण सभेत मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजेंद्र कोंढरे यांची निवड करण्यात आली. तसेच अखिल भारतीय मराठा महासंघ सर्वसाधारण सभेत महासंघाच्या 2022 ते 2025 या कालावधी करिता नवीन कार्यकारणी ची निवड करण्यात आली आहे.
सभेच्या अध्यक्षस्थानी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील होते. यावेळी राज्य कोषाध्यक्ष प्रकाश देशमुख, सचिव प्रमोद जाधव, महिला राष्ट्रीय प्रतिनिधी कविता भोसले, अवधूत पाटील,सुहास निंबाळकर, मारुती मोरे, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.
या निवड प्रक्रियेवर काही व्यक्तींनी मुंबई सत्र न्यायालयात व मुंबई उच्च न्यायालयातअर्ज केले होते. त्यास स्थगित देण्यास न्यायालयाने नकार दिला त्यानंतर आज पंढरपूर येथे सर्वसाधारण सभा झाली या राज्याच्या सर्व भागातून मोठ्या संख्येने सभापती विभागातील पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी राजेंद्र कोंढरे म्हणाले तीन लाख कुटुंबापर्यंत संपर्क साधून महासंघाची घटनात्मक बांधणी करून महासंघ यापुढे मराठा समाजाचे आर्थिक प्रश्न सामाजिक सलोखा उद्योग व्यवसाय शिक्षण कृषी या विषयावर मोठ्या प्रमाणावर काम करणार आहे.
यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी राजेंद्र कोंढरे यांनी युवकांना रोजगार संबंधी , व्यावसायिक दृष्टीने पुढचे पाऊल टाकण्याची दिशा , आरक्षण संदर्भात माहिती अश्या प्रकारे बहुमुल्य असे मार्गदर्शन केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक विजय वाघचौरे , स्वागत युवक कार्याध्यक्ष राकेश गायकवाड , कार्यक्रमाचे आभार सरचिटणीस सचिन वडघुले यांनी केले. यावेळी युवक उपाध्यक्ष सुनील पवार युवक प्रसिद्धी प्रमुख भरत गायकवाड व इतर पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते .