Download App

‘ही’ एक लाचार प्रवृत्ती; राम सातपुतेंनी रणजितसिंह मोहितेंना खिजवले !

  • Written By: Last Updated:

Ranjitsinh Mohite Patil VS Ram Satpute: माळशिरस मतदारसंघातून पराभूत झाल्यापासून राम सातपुते (Ram Satpute) हे मोहिते कुटुंबावर टीका करायची एकही संधी सोडत नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विधानपरिषदेचे सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांनी भाजपविरोधात काम केले आहे. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी माजी आमदार राम सातपुते यांची आहे. यावर अद्याप भाजप नेत्यांनी निर्णय घेतलेला आहे. उलट महसूलमंत्री व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोलापूर येथील बैठकीला रणजितसिंह मोहिते पाटील हेही उपस्थित होते. त्यावरून राम सातपुते हे चिडले आहे. त्यावरून त्यांना रणजितसिंह मोहितेंवर टीका केलीय.

अजित पवार अन् शरद पवार दिलजमाईत कुणाचा खोडा? राऊतांनी घेतली ‘या’ दोन नेत्यांची नावं

याबाबत राम सातपुते म्हणाले, भाजपच्या जीवावर त्यांना आमदारकी भेटली आहे. त्यानंतर ही त्यांनी पक्षाविरोधात काम केले आहे. पक्षातून हकालपट्टी करून त्यांना मोठे करायचे नाही, म्हणून पक्षाने अद्याप निर्णय घेतलेला नसावा. अनुशासन समितीने हा केंद्रीय नेतृत्वाला पाठविला आहे. तरीही पक्षाच्या बैठकाला ते येतात. ही एक लाचार प्रवृत्ती जिल्ह्याने बघितली आहे.

भाजपमध्ये काय केले आहे. पद्धत कशी आहे. ते गद्दारी करू शकतात. पक्ष येत्या काळात कारवाई करेल आणि केली पाहिजे, अशी मागणी सातपुते यांनी केलीय. निवडणुकीला त्यांच्या नाकाखालून एक लाख आठ हजार मते आम्ही काढली आहेत. या तालुक्यात आम्ही म्हणजे इतके मोठे नेते हे बोलायची पद्धत होती. परंतु त्यांच्या अकलुजमधून मते काढली. तालुक्यातील लोकांना माहिती आहे की कामाचा माणूस कोण आहे. राम सातपुते हा एखाद्या पराभवाने दुख: कुरवळत बसणारा नाही नाहीतर लढणारा नेता आहे. परंतु बैठकीला येतात. या लाचारप्रवृत्तीविरोधात मी लढतच राहणार आहे. पक्षाला माझी ताकद किती आहे हे माहिती आहे. ज्या तालुक्यात लोकसभेला आमच्याविरोधात 70 हजार मतांचे लीड होते. तो तुडून विधानसभा सहा हजारांवर आणून ठेवले आहे. त्यामुळे तालुका भाजपच्या विचाराचा आहे. आम्ही लढू, असे सातपुते म्हणाले.

VIDEO : दुचाकीला धक्का लागला… एसटी चालकाला महिलेनं रस्त्यातच चपलांनी चोपलं, व्हिडिओ व्हायरल


बावनकुळेंनी विषय केंद्राकडे लोटला

गुरुवारी महसूलमंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी पत्रकारांनी बावनकुळेंना रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या कारवाईबाबत विचारले. ते म्हणाले रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या कारवाईचा विषय हा केंद्रीय स्तरावर अनुशासन समितीकडे आहे.पक्षाची केंद्रीय अनुशासन समिती त्याबाबतचा निर्णय घेईल, असे सांगून हा विषय केंद्राकडे लोटला आहे.


मोहितेंवर कारवाई नाही पण कौतुक

भाजप सदस्य नोंदणीमध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाग घेतला. एक हजार सदस्य नोंदणी केली. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्र पाठवून रणजितसिंह मोहिते यांचे कौतुकही केले होते. तर काही दिवसांपूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मुलाचा विवाह झाला. या विवाहाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर भाजप नेतेही आले होते. त्यामुळे त्यांच्यावर भाजप कारवाई करेल का हाही प्रश्न आहे.

follow us