Download App

सलग सातवेळा खासदार राहिलेले काँग्रेसचे निष्ठावान नेते संदीपान थोरात कालवश

सोलापूर : सलग सात वेळा खासदार राहिलेले काँग्रेसचे निष्ठावान नेते संदीपान थोरात यांचं निधन झालं आहे. त्यांनी पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेससाठी सात वेळा प्रतिनिधित्व केले आहे. ते ९० वर्षांचे होते. सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

कोरोना घटला ! एका दिवसात सापडले 425 नवे कोरोनाबाधित

थोरात यांचे गांधी कुटुंबियांशी जवळचे संबंध होते. गांधी कुटुंबियांसह शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. 1977 ते 1998 असे सलग सात वेळा थोरात खासदार राहिलेले आहेत. संदिपान थोरात हे मुळचे माढा तालुक्यातील निमगाव येथील होते. त्यांनी माढा येथे जगदंबा सुतगिरणीची स्थापना केली होती.

हावडामध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा , शिवपूरमध्ये पुन्हा दगडफेक

त्यांच्या पश्चात चार मुले, तीन मुली, पत्नी असा परिवार आहे. संदिपान थोरात हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते. मध्यंतरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.

Bholaa Box Office Collection: ‘भोला’ची ग्रँड ओपनिंग! पहिल्याच दिवशी कमावले 11.50 कोटी

सामान्य मातंग समाजातून आलेले आणि गांधी घराण्यावर एकनिष्ठ म्हणून ओळखले गेलेले संदीपान थोरात हे प्रतिष्ठित वकील होते. थोरात यांचे मूळ गाव माढा तालुक्यातील निमगाव होते. तरूणपणीच काँग्रेसच्या माध्यमातून ते राजकारणात सक्रिय झाले.

1977 साली काँग्रेसच्या पडत्या काळात संदीपान थोरात यांना पंढरपूरच्या तत्कालीन लोकसभा राखीव मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळाली होती. तेव्हा देशभर जनता पक्षाची लाट असतानाही थोरात हे निवडून आले होते.

Tags

follow us