Shambhuraj Desai : राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. अलीकडेच बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर महिला व मुलींच्या सुरक्षेबाबत सातारा जिल्हा प्रशासन (Satara News) आता ॲक्शन मोडवर आले आहे. महिला आणि मुलींची सातत्याने छेड काढताना तिसऱ्यांदा आढळल्यास पोलिसांनी संबंधितांची शहरातून धिंड काढावी, अशी सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिल्यात.
पुण्यात रक्ताचा थरार, दारूवरून वाद अन् हातोड्याने वार, सराईत गुंडाची निर्घृण हत्या
रिक्षांमध्ये क्यूआर कोड बसवणार
बदलापूर आणि कोलकाता येथील घटनेनंतर सातारा जिल्ह्यातही महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी कठोर पावले जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे, याची माहिती पालकमंत्री देसाई यांनी पत्रकारांना दिली. जिल्ह्यातील महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना केल्या जात असून सर्व बस, रिक्षा, वडापमध्ये क्यूआर कोड बसविण्यात येणार आहेत. प्रवासादरम्यान, कोणी छेडछाड करत असल्यास महिलांना क्युआर कोड स्कॅन करावा. त्यामुळे पोलिसांना अलर्ट जाईल आणि संबंधितांनार कारवाई होईल, असं शंभूराज देसाई यांनी सांगितले.
मोठी बातमी : महाराष्ट्र बंदपूर्वी ‘मविआ’ला मुंबई HC दणका; बंद करणाऱ्यांविरोधात कारवाई करा
पुढं ते म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक शाळा आणि महाविद्यालयातील मुलींसाठींच्या स्वच्छतागृहात जाण्यासाठी जाण्याच्या एंट्री पॉईंटमध्ये बदल केला जाणार आहे. तसेच महिला कर्मचाऱ्यांकडूनच स्वच्छतागृहांची सफाई करण्यात यावी, अशी सक्त सूचना दिली आहे. तसेच या कामासाठी रोजंदारीवर घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे पोलिस व्हेरिफिकेशन केले जाणार आहे. येत्या आठ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना प्रशासनाला केल्याचं देसाईंना सांगितलं.
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व माध्यमिक शाळांची तातडीने तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस आणि शिक्षण विभागाच्या वतीने सोमवारपासून प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका होणार आहेत. यामध्ये कोणत्याही पालकांना आपल्या मुलीबाबत काही शंका किंवा प्रश्न असल्यास महिला पोलिसांना त्या कळविल्या जाणार आहेत. त्यामुळे तातडीने त्याच दिवशी संबंधितांवर कठोर कारवाई करता येईल, असंही देसाईंनी सांगितलं.