Video : मंत्री शंभुराज देसाई अन् आईंना अश्रू अनावर; आजोबांच्या ‘मेघदूत’मध्ये प्रवेश, आठवणींना उजाळा

Video : मंत्री शंभुराज देसाई अन् आईंना अश्रू अनावर; आजोबांच्या ‘मेघदूत’मध्ये प्रवेश, आठवणींना उजाळा

Shambhuraj Desai Meghdoot Housewarming : शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांना आज हुंदका आवरला नाही. त्यांची आई विजयादेवी देसाई यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि देसाई यांनी रोखून धरलेला अश्रूंचा बांध मोकळा केला. मेघदूत बंगल्याच्या गृहप्रवेशावेळी मंत्री शंभूराज देसाईं आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाले. (Meghdoot) मेघदूत बंगल्यावर शंभूराज देसाई यांचं बालपण गेलं आहे. आजोबा बाळासाहेब देसाई यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मेघदूत बंगला मिळाला होता.

आज मेघदूत बंगल्यात मंत्री शंभूराज देसाई यांनी कुटुंबासह प्रवेश केला. या दरम्यान मंत्री शंभूराज देसाई यांचा जन्म झाला होता. त्यावेळी पहिली पाच वर्ष शंभूराज देसाई यांनी बालपण घालवलं होतं. त्यानंतर आज तब्बल ५५ वर्षानंतर शंभूराज देसाई आपल्या मातोश्रीसह गृहप्रवेशा दरम्यान आले असताना त्यांचे डोळे पानावले. तर संपूर्ण देसाई कुटुंब भावूक झाले. मंत्री शंभूराज देसाई यांच्या मातोश्री विजयादेवी शिवाजीराव देसाई यांनी यावेळी भावनांना वाट मोकळी करून दिली.

शंभूराज याचा जन्म या बंगल्यातला आहे. मला त्याला कलेकटर करायचं होतं. मात्र, तो आज कलेक्टरपेक्षा मोठा झाला. आमदार झाला, मंत्री झाला. आम्हाला पावनगड बंगला मिळाला होता. पण मी विचारयचे मेघदूत बंगला मिळेल का आईची इच्छा त्याने पूर्ण केली. आज त्यांचे वडील असते तर आनंद झाला असता. या बंगल्याशी संबंधीत अनेक आठवणी आहेत. घरात प्रवेश करताना पहिली आठवण बाळासाहेब आणि ताईसाहेबांची आली. आमच्यावेळी हा बंगला ब्रिटिश कालिन होता, अशी आठवण शंभूराज देसाई यांच्या आईने सांगितली.

राऊतांचे खबरी एक दिवस त्यांनाच अडचणीत आणतील : मंत्रिमंडळातील गँगवॉरवर शंभुराज देसाईंचा खुलासा

आईने सांगितल्यानंतर, क्लासलिडर होण्यासाठी मी शाळेत मुलांना चॉकलेट वाटायचो. तिने ते व्यवस्थित लक्षात ठेवलं. देसाई घराण्याचं नाव टिकवण्यासाठी पराभव समोर दिसत असताना आई राजकारणात उतरल्या, पराभव झाला. मात्र, एक शब्द तिने काढला नाही. ज्या पाटणकरांनी माझ्या आईचा पराभव केला त्यांचा मी पराभव केला याचं समाधान आहे. ते पाटणकर आता जरी टीका करत असले तरी माझ्या वरिष्ठांनी मला श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला दिला आहे, असं सांगायला मंत्री महोदय विसरले नाहीत.

आज नवीन शासकीय निवासस्थान मेघदूत हा बंगला मुख्यमंत्र्यांनी दिला. त्यांचे आभार मानतो. आज माझ्या आईचा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने गृहप्रवेश केला. लहानपणापासून या बंगल्याशी अनेक आठवणी आहेत. मेघदूत बंगला मिळावा यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली होती. मी एकदाच सांगितलं दुसर्यांदा सांगावं लागलं नाही. गृहप्रवेशावेळी आईला भरून आलं, लग्नानंतर याच घरात त्यांनी प्रवेश केला. आम्ही सर्वच भावूक झालो, अस शंभूराज देसाई म्हणाले.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्रात मोठं काम केलं. तसचं, कार्य माझा हातून घडावं या माझा भावना आहेत. आई वडिल दोघांची इच्छा होती की मी स्पर्धा परीक्षा दयावी. आई म्हणायची तू कलेक्टर हो. अकस्मित माझ्या वडीलांचं निधन झालं आणि सर्व जबाबदारी माझ्यावर आली. मतदार संघातील दिग्गज नेत्यांनी आईंना विनंती करून मला राजकारणात पाठवण्यास सांगितलं. २० वर्षांचा असताना १९९६ झाली मी बिनविरोध सहकारी कारखान्याचा चेअइरमन झालो, अशा आठवणी मंत्री देसाई यांनी यावेळी जागवल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube