अपात्र आमदार प्रकरण; शंभूराज देसाई म्हणतात, ‘आमचे आमदार दोषी नाहीत’…

अपात्र आमदार प्रकरण; शंभूराज देसाई म्हणतात, ‘आमचे आमदार दोषी नाहीत’…

आमचे आमदार दोषी नाहीत, त्यामुळे वेळकाढूपणाचा संबंधच नाही, अशी भूमिका मंत्री शंभूराज देसाई यांनी मांडली आहे. अपात्र आमदारांची सुनावणी आज विधीमंडळात पार पडली. या सुनावणीनंतर शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आमचे आमदार दोषी नसल्याचा दावादेखील केला आहे.

कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे की नाही? ज्याचा-त्याचा अधिकार, मनोज जरांगेंचे नारायण राणेंना प्रत्युत्तर

पुढे बोलताना ते म्हणाले, अपात्र आमदारांची सुनावणी सुरु आहे, त्यामध्ये कोणीही गडबड करु नये, आमदारांना आपली बाजू मांडण्यासाठी संधी द्या, आमचे आमदार दोषी नाहीत त्यामुळे वेळकाढूपणा करण्याचा संबंधच नसल्याचं शंभूराज देसाई म्हटले आहेत.

समृद्धीवरील अपघात थांबविण्यासाठी CM शिंदे जर्मनी दौऱ्यावर; थेट बर्लिनमधून आणणार मेगा प्लॅन

या सुनावणीत आमदारांना पत्र मिळाल्यानंतर सात दिवसांत त्यांनी आपला अभिप्राय कळवायचा आहे, व्हीपची नेमणूक करण्याचा अधिकार राजकीय पक्षाला आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. मूळ पक्ष कोणाचा याची खात्री होत नाही तोपर्यंत निर्णय घेणे अवघड आहे. तोवर व्हीपचा निर्णय घेणे अवघड आहे. त्यामुळे आधी मूळ राजकीय पक्ष कोणता हे बघावं लागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

कर्नाटकमध्ये 195 तालुक्यांत दुष्काळ जाहीर होणार; महाराष्ट्रात शिंदे सरकारच्या निर्णायकडे राज्याचे लक्ष

मागील वर्षी राज्यात राजकीय सत्ता नाट्य घडलं. या सत्तानाट्यात सर्वाधिक मुद्दा गाजला तो अपात्र आमदारांचं प्रकरण. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. त्यानंतर सत्तासंघर्षाचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात पोहचला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयात हा वाद मिटेल? असं वाटत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता. अखेर आता या प्रकरणाची सुनावणी आज पार पडली.

काही दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना आपली भूमिका मांडण्यासाठी नोटीस पाठली होती. विधानसभा अध्यक्षांच्या नोटीसनंतर ठाकरे गटाकडून उत्तर सादर करण्यात आले होते. पण शिंदे गटाच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या नोटीसला उत्तर देण्यासाठी आणखी मुदत मागितली होती. त्यामुळे अपात्रतेची सुनावणी आणखी पुढे ढकलली होती. मात्र, आता हे उत्तर सादर करण्यात आले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube