Download App

अजितदादा आमचे नेते आहेत असं म्हणालोच नाही; पवारांचं काही तासातचं घुमजाव

  • Written By: Last Updated:

सातारा :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत आज (दि. 25) सकाळी केलेल्या विधानावर अवघ्या काही तासातचं घुमजाव केले आहे. पवारांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आपण अजित पवार आमचे नेते आहेत असे विधान केलेच नसल्याचे पवारांनी म्हटले आहे. ते साताऱ्यात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.अजित पवार आमचे नेते आहेत, असं मी म्हणालो नाही सुप्रिया त्यांची धाकटी बहिण आहे. बहिण भावाच्या नात्यात सहजपणे बोलत असतील तर त्याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नसल्याचेही यावेळी पवारांनी स्पष्ट केले.

ठराविक लोकांनी टार्गेट केलं, आता पक्षश्रेष्ठींनी मला… आ. तांबेंनी दिले घरवापसीचे संकेत

बारामतीत काय म्हणाला होते पवार?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राष्ट्रवादीत कोणतीही फूट नाही. अजित पवारच आमच्या पक्षाचे नेते आहेत अशी भूमिका काल जाहीर केली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही त्यावर शिक्कामोर्तब केले. अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत. त्यात काहीच वाद नाही. फूट पडणे याचा अर्थ काय, पक्षात फूट कधी होते याचा अर्थ सांगत शरद पवार यांनी हे वक्तव्य केले होते.

.. तर आता पवारसाहेबांनी आम्हाला समर्थन द्यावे; भुजबळांनीही सांगितलं मनातलं

एकदा संधी दिली आता पुन्हा नाही 

एकदा, दोनदा एखाद्या व्यक्तीने वेगळी भूमिका घेतली असेल. तेव्हा व्यक्तीला आम्ही एक संधी दिली होती. पहाटेच्या शपतविधी वेळी आम्ही आधी निर्णय घेतला होता. पण त्यानंतर ते झालं ते योग्य झालं नाही, आमच्याकडून योग्य काम झालं नाही, अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली होती. त्यामुळे पक्षाने त्यांना एक संधी होती. पण संधी ही नेहमी मागायची नसते. आता आमची भूमिका वेगळी आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

लोकसभेत मविआ सर्वाधिक जागा जिंकेल

यावेळी पवारांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सर्वाधिक जागा जिंकेल असा विश्वासही व्यक्क करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही हे सुद्धा स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, अजित पवार आमचे नेते आहेतच त्यात काही शंकाच नाही. फूट पडणे याचा अर्थ पक्षात फूट कधी होते? जर पक्षातच एक मोठा वर्ग देशपातळीवर वेगळा झाला तर. पण, आज येथे तशी स्थिती नाही. काही लोकांनी पक्ष सोडला, वेगळी भूमिका घेतली त्यामुळे पक्षात फूट पडली असं म्हणण्याचं काहीच कारण नाही. त्यांचा निर्णय त्यांनी घेतला, आहे असे पवार यांनी स्पष्ट केले.

‘पवारांचं विधान नुसता गेम नाही तर ऑलिम्पिकचं; अधिक विचार केला तर डोकं फुटेल’

सुप्रिया सुळेंचेही घुमजाव 

पवारांपाठोपाठ खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील त्यांच्या विधानावरून घुमजाव केला आहे. त्या म्हणाल्या की, ज्याप्रमाणे अटलबिहारी वायपेयी भाजपचे नेते आहेत त्यांना आम्ही मानतो. त्याप्रमाणे अजित पवार महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीत कोणतीही फुट पडलेली नसल्याचे पुनुरूच्चार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. सुळे आणि पवारांच्या अशा प्रकारच्या दुटप्पी विधानामुळे अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असून, नेमकं पवारांच्या मनात काय असा प्रश्न यामुळे अनेकांच्या मनात उपस्थित झाल्या आहेत.

Tags

follow us