Sharad Pawar on Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर (Solapur Housing Project) येथे येणार होते. तुम्ही त्यांचे भाषण बघा, 100 टक्के मी सांगतो त्यांनी माझ्यावर टीका केली असेल. शिर्डीला दर्शनासाठी गेले होते, त्यावेळी भाषणात सांगितले की शरद पवारांनी देशासाठी काय केलं? अरे बाबा साईबाबांचे दर्शनाला आला तर दर्शन घ्या, उगीच चुकीची मांडणी करु नका. हा त्यांचा स्वभाव आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पीएम नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर केली.
आज सोलापूरला येणार आल्यावर देखील ते तेच करतील. कार्यक्रम आहे घरांचा पण बोलतील शरद पवारांवर. त्याचं कारण म्हणजे पूर्वीच्या काळात जसं छत्रपतींच्या नंतर संताजी-धनाजी आणि त्यांचे घोड्यांची चिंता कोणाला लागत असे. आज तशाप्रकारची चिंता राज्यकर्त्यांना आम्हा लोकांबद्दल वाटते. त्यामुळे अशाप्रकारची विधाने ठिकठिकाणी केली जातात, अशी टीका शरद पवार यांनी सांगोला येथून केली.
‘आता लोकसभा निवडणूक लढवा’; प्रकाश आंबेडकरांचे मनोज जरांगे पाटलांना आवाहन
शेतकरी उगाच आत्महत्या करत नाही. त्यालाही जीव प्यारा आहे. पण जगणं जेव्हा अशक्य होतं, ज्यावेळी समाजात स्वाभिमानाने भूमिका घेता येत नाही, त्यावेळी अतिरेक झाल्यानंतर माणूस आत्महत्येच्या रस्त्याला जातो. म्हणून पंतप्रधान मनमोहन सिंग आणि आम्ही 71 हजार कोटींच्या कर्ज माफीचा निर्णय घेतला. आणि आत्महत्या थांबल्या. आज पुन्हा शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज आहे. यासाठी अनेक सवलती द्यायला पाहिजेत, असे शरद पवार यांनी म्हटले.
कोचिंग सेंटर्सचा बाजार उठणार?; सरकारचा मास्टर स्ट्रोक विद्यार्थ्यांसाठी किती फायद्याचा
ते म्हणतात शरद पवार कृषिमंत्री असताना काय केलं? पण त्यावेळी सोसायटीच्या किंवा बॅंकेच्या शेतीच्या कर्जाचा दर 11 आणि 12 टक्क्यांवर होता. तीन लाखांपर्यंत कर्ज भरणाऱ्या लोकांना व्याजाचा दर 4 टक्क्यांपर्यंत होता. आज त्याकडे सरकारचे लक्ष आहे का? असा सवाल शरद पवार यांनी केला.