Download App

उदयनराजेंबद्दल प्रश्न विचारताच पवारांनी थेट कॉलरच उडवली; पत्रकार परिषदेत काय घडलं?

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar on Udayanaraje : महायुतीकडून (Mahayuti) लोकसभेची उमेदवारी (Lok Sabha Elections) मिळविण्यासाठी राज्यसभा खासदार उदयनराजेंना ( Udayanaraje) मोठा संघर्ष करावा लागत आहे. ते भाजपकडून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर केली नाही. त्यामुळं काहीच दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली. तिकीट मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतरच ते परतले. उमेदवारी मिळत नसल्यामुळं ते मध्यंतरी भाजपच्या संपर्कात होते, असा दावा केला जातोय. यानंतर यावर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते शरद पवारांनी (Sharad Pawar) भाष्य केलं.

‘मला शरद पवारांकडून जागा मिळाली असती’; रामदास आठवलेंनी आळवला नाराजीचा सूर 

शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शरद पवारांनी आधी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली. साताऱ्याच्या जागेपासून ते वंचित बहुजन आघाडीपर्यंतच्या प्रश्नांना पवारांनी उत्तरं दिली. यावेळी शरद पवार यांना छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर पवार यांनी उदयनराजे भोसले यांची हुबेहुब नक्कल करत कॉलर उडवली.

‘आदुजीविथम – द गोट लाइफ’ची धमाकेदार सुरुवात, पहिल्याच दिवशी अपेक्षेपेक्षा अधिक कमाई 

महायुतीने अद्याप उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे त्यांनी तुमच्याशी संपर्क साधला तर तुम्ही त्यांच्याशी बोलणार का? असा प्रश्न शरद पवारांना विचारला. त्यावर पवारांनी आता तशी शक्यता नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं. ते म्हणाले, उदयनराजे सध्या भाजपमध्ये आहेत. मी पाहिले दोन दिवसांपूर्वी सातारा शहराने त्यांचे संपूर्ण रस्त्यात स्वागत केले. त्यामुळं त्यांनी आमच्याशी संपर्क साधण्याचा विषयच येत नाही, असं पवार म्हणाले.

‘आदुजीविथम – द गोट लाइफ’ची धमाकेदार सुरुवात, पहिल्याच दिवशी अपेक्षेपेक्षा अधिक कमाई

तसेच पत्रकार म्हणाले की, तुम्हीही कॉलर उडवणार का? त्यावर शरद पवारांनी पत्रकार परिषदेतच आपली कॉलर उडवून दाखवली. त्यामुळे पत्रकारांमध्येही हशा पिकला. दरम्यान, साताऱ्यात नवा उमेदवाराचा शोध घेण्याचे आव्हान निर्माण झालेले असतांनाच शरद पवारा यांनी मात्र साताऱ्याच्या भूमित थाटात कॉलर उडवली. कॉलर उडवून त्यांनी एक प्रकारे उदयनराजेंना आव्हानच दिलं आहे.

पृथ्वीराज चव्हाणांना साताऱ्याची जागा देणार का? असा प्रश्नही शरद पवारांना विचारण्यात आला. त्यावर साताऱ्याची जागा राष्ट्रवादीची आहे. त्यामुळे येथे राष्ट्रवादीचाच उमेदवार उभा राहणार असल्याचं पवार यांनी स्पष्ट केले.

 

follow us