‘आदुजीविथम – द गोट लाइफ’ची धमाकेदार सुरुवात, पहिल्याच दिवशी अपेक्षेपेक्षा अधिक कमाई

‘आदुजीविथम – द गोट लाइफ’ची धमाकेदार सुरुवात, पहिल्याच दिवशी अपेक्षेपेक्षा अधिक कमाई

Aadujeevitham- The Goat Life Box Office Collection Day 1: पृथ्वीराज सुकुमारन (Prithviraj Sukumaran) यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘Aadujeevitham – The Goat Life’ अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला केवळ समीक्षकांकडूनच उत्तम प्रतिसाद मिळाला नाही तर प्रेक्षकांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. यासह ‘आदुजीविथम – द गोट लाइफ’ने बॉक्स ऑफिसवर ( Box Office) दमदार सुरुवात केली आहे. पृथ्वीराज सुकुमारन यांच्या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी किती कोटींचा गल्ला चला तर मग जाणून घेऊया?

‘आदुजीविथम – द गोट लाइफ’ ने पहिल्या दिवशी किती कमाई केली?

साऊथ सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन यांच्या ‘आदुजीविथम – द गोट लाइफ’चा दमदार ट्रेलर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाला 16 वर्षे पूर्ण झाली. एका मल्याळी स्थलांतरित मजुराच्या कथेवर आधारित ‘आदुजीविथम – द गोट लाइफ’मध्ये पृथ्वीराजने मेंढपाळाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येताच प्रेक्षकांच्या मनाला भिडला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. कामाच्या दिवशी रिलीज होऊनही सिनेमाने चांगली ओपनिंग केली आहे.

Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 7.45 कोटी रुपये कमवले आहेत. यामध्ये चित्रपटाने मल्याळम भाषेत 6.5 कोटींची कमाई केली आहे. तर कन्नड, तामिळ, तेलगू आणि हिंदी भाषेतील व्हर्जनमध्ये या चित्रपटाने पहिल्या दिवशी एकूण 1 कोटींची कमाई केली आहे. पृथ्वीराज सुकुमारनने पहिल्याच दिवशी मंजुम्मेल बॉईजचा विक्रम मोडला. मंजुम्मेल बॉईज हा मल्याळम सिनेमात सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा आहे. बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा ओलांडला होता. पृथ्वीराज सुकुमारनच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘आदुजीविथम – द गोट लाइफ’ ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी मल्याळममधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘मंजुम्मेल बॉईज’चा बॉक्स ऑफिसवर विक्रम मोडला आहे.

‘मंजुम्मेल बॉईज’ने पहिल्या दिवशी 3.9 कोटी रुपयांचे कमाई केली होती. पृथ्वीराजच्या चित्रपटाने देशभरात पहिल्या दिवशी 7.45 कोटी रुपयांची कमाई केली आहे, असे सहज म्हणता येईल की आदुजीविथम – द गोट लाइफ ओपनिंग डे आणि मल्याळमच्या लाईफटाईम कलेक्शनमध्ये मंजुम्मेल बॉईजला पराभूत करू शकतो. सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रम करू शकतो.

सोनू सूदने ‘या’ कारणासाठी हार्दिक पांड्याला केला सपोर्ट; म्हणाला, ‘आम्ही आमच्या खेळाडूंचा …’

‘आदुजीविथम – द गोट लाइफ’ आठवड्याच्या शेवटी जोरदार कमाई करेल

‘आदुजीविथम – द गोट लाइफ’ची सुरुवात चांगली झाली आहे. अशा परिस्थितीत, वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत वाढ होईल आणि तो मजबूत कलेक्शन करेल अशी निर्मात्यांना आशा आहे. त्याचप्रमाणे देशभरात गुड फ्रायडेची सुट्टी आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाला लाँग वीकेंडचा फायदा मिळू शकतो. सध्या सर्वांच्या नजरा ‘आदुजीविथम – द गोट लाइफ’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर खिळल्या आहेत.

‘आदुजीविथम – द गोट लाइफ’ स्टार कास्ट

पृथ्वीराज सुकुमारन व्यतिरिक्त अमला पॉल, जिमी जीन लुईस, शोभा मोहन, केआर गोकुल, तालिब अल बलुशी, रिक एबी यांच्यासह अनेक कलाकारांनी ‘आदुजीविथम – द गोट लाइफ’ मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ब्लेसी यांनी केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube