Raju Shetty : गेल्या काही दिवासांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रचंड आक्रमक झाले आहेत. आताही त्यांनी परराज्यातून महाराष्ट्रात पोलिसी बंदोबस्तात ऊस येतो, असा दावा केला. हुपरी पोलीस (Hupari Police) राजरोजसपणे कर्नाटक राज्याच्या हद्दीत जातात. त्या ठिकाणाहून पोलीस बंदोस्तात ऊसाची वाहने राज्यात आणतात. जिल्हा पोलीस प्रमुखांची परवानगी नसतांना बेकायदेशीररित्या हुपरी पोलिस हे कृत्य करत आहे. पोलिसांनी ऊस आणण्याचा ठेका घेतला आहे, असा गंभीर आरोप शेट्टी यांनी केला.
Shehnaz Gill : लाल ड्रेसमध्ये शहनाजचा ग्लॅमरस अंदाज
कर्नाटकातील ऊस पोलीस बंदोबस्तात आणण्यासाठी पोलिसांना ठेका दिला, असा आरोप करत शेट्टी यांनी या संदर्भातला व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओत पोलीस बंदोबस्तात ऊसाची वाहने मांगून येराज्यात येत असल्याचं दिसतं.याबाबत आज माध्यमांशी बोलतांना शेट्टी म्हणाले की, पोलीस राजरोसपणे कर्नाटकात जातात आणि ऊस कारखान्याला आणतात. हे बेकायेदशीर आहे. पोलिसांनी कारखान्याचा ठेका घेतला आहे. पोलीस सुपारी घेऊन काम करत आहेत, असं शेट्टी म्हणाले.
ते म्हणाले, राज्याबाहेर जाण्यासाठी पोलिसांना जिल्हा पोलीस प्रमुखांची परवानगी घ्यावी लागते. ज्या राज्यात गेलेत तेथील स्थानिक पोलिसांना सोबत घेऊन कारवाई करावी लागते. मात्र, हुपरी पोलीस राजरोसपणे कर्नाटक हद्दीत जातात. त्या ठिकाणाहून पोलीस बंदोबस्तात ऊसाची वाहने जवाहर कारखान्यात आणतात.
पोलीस सुपारी घेऊन काम करत आहेत, हे चित्र जनतेसमोर येणं वाईट आहे. गृहमंत्री फडणवीसांना विनंती आहे की, पोलिसांना रोखा. अन्यथा पोलीस राज्याबाहेर गेले तर ते सामान्य नागरिकच आहेत. सामान्य नागरिक समजून आम्ही त्यांना चोप देऊ, असा इशारा शेट्टी यांनी दिला.
शिंदे-फडणवीस-पवार सरकारने राज्यातील ऊस बाहेर निर्यात करण्यावर बंदी घातली होती. त्यामुळं राजू शेट्टी चांगलेच आक्रमक झाले होते. निर्यातबंदी हटवण्यासाठी आणि उसाला दुसरा हप्ता 400 रुपये देण्यासह अन्य काही मागण्यांसाठी शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी आक्रोश पदयात्रा काढली होती. त्यानंतर आता त्यांनी अन्य राज्यातील ऊस महाराष्ट्रात आणण्यासाठी पोलीस सुपारी घेऊन काम करत आहेत, असा आरोप त्यांनी केली. शेट्टी यांनी केलेल्या आरोपावर आता जिल्हा पोलीस प्रमुख काय प्रतिक्रिया देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.