Sujay Vikhe On Balasaheb Thorat : भावी मुख्यमंत्री हे निवृत्तीपर्यंत भावीच राहणार असल्याचा सणसणीत टोला भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना नाव न घेता लगावला आहे. दरम्यान, अहमदनगरमधील श्रीरामपूर तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमादरम्यान बाळासाहेब थोरात यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ या मजकूराचे बॅनर झळकले होते. त्यावरुन विखेंनी टीका केलीय. विखे भाजपच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.
आधी घरातल्या वाटण्या करा, प्रदेशाध्यक्ष पदावरून सुजय विखेंचा अजित पवारांना चिमटा
खासदार विखे पाटील म्हणाले, राज्यातील विरोधी पक्षात जेवढी आमदारांची संख्या राहिली आहे तेवढेच भावी मुख्यमंत्रीही आहेत, अशा नेत्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आम्ही भावी मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत नसून आजीमध्ये आहोत. आगामी काळात भाजप-शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहणार असल्याचं सुजय विखेंनी ठणकावून सांगितलं आहे.
Ratnagiri Accident : शिंदे सरकार सरसावलं… नातेवाईकांना पाच लाखांची मदत अन् जखमींचा खर्च
तसेच राज्यातील जनतेने भाजप-शिवसेना सरकारला कामाची पावती दिली आहे, भविष्यातही जनता आम्हाला कामाची पावती देणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, विखे पाटलांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर केलेल्या टीकेवरुन आता पुन्हा एकदा थोरात-विखे यांच्यात वाकयुद्ध होणार असल्याचं दिसून येत आहे. अद्याप विखे पाटलांच्या टीकेवर थोरातांनी भाष्य केलेलं नसून थोरात काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मुंडेंचा डीएनएचं भाजप :
पंकजा मुंडे भाजपचं एक सक्षम नेतृत्व असून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करीत आहोत. पंकजा मुंडेंसारखा नेता आपल्या पक्षात असणं याचा प्रत्येक पक्षाला हेवा वाटेल. मुंडे यांनी कितीही ऑफर आल्या तरीही त्या भाजप सोडणार नसून त्यांच्या डीएनएमध्ये भाजप असल्याचं खासदार सुजय विखे यांनी स्पष्ट केलं आहे.