Ratnagiri Accident : शिंदे सरकार सरसावलं… नातेवाईकांना पाच लाखांची मदत अन् जखमींचा खर्च

Ratnagiri Accident : शिंदे सरकार सरसावलं… नातेवाईकांना पाच लाखांची मदत अन् जखमींचा खर्च

Ratnagiri Accident : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-हर्णे मार्गावर एक ट्रक आणि खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात (Road Accident)आठ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अपघातामध्ये सहाजण प्रवासी जखमी झाले आहेत. यामधील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून (chief minister relief fund) प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्याचबरोबर जखमींवर योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. (ratnagiri-road-accident-cheaf-minister-announced-5-lakhs-rupies-help-victims-relatives)

शिंदे कुटुंबियांचे गुन्हेगार गजाआड; एकाच हॉटेलमध्ये सापडले माजी नगरसेविका अन् खंडणीबहाद्दर पोलीस अधिकारी

मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटरवरुन (CMO Maharashtra)याची माहिती देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेची माहिती घेतली आहे. रविवारी दुपारी झालेल्या या भीषण अपघातात ट्रकने प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला अक्षरशः फरपटत नेल्याचे समजते.

या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी (दि.25) दुपारी दोनच्या दरम्यान हा अपघात झाला. बस प्रवाशांना घेऊन दापोलीकडून आंजर्लेकडे निघाली होती. आसूद जोशी आळी येथील वळणावर समोरुन येणाऱ्या ट्रक आणि बसची जोराची धडक बसली. समोरुन येणाऱ्या ट्रकचा वेग अधिक असल्याने बस काही अंतरापर्यंत फरपटत गेली. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये बसचा चक्काचूर झाल्याचे दिसत आहे. या अपघातात बसमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात आणि एका महिलेचा डेरवण येथे नेताना मृत्यू झाला.

Shah Rukh Khan: किंग खानने रिंकू सिंगबद्दल म्हणाला, ‘बाप आहे बच्चा नही…’

अपघातामध्ये बसचालक अनिल सारंग (वय 45 रा. हण्र), संदेश कदम (वय 55), स्वरा संदेश कदम (वय 8), मारियम काझी (वय 64), फराह काझी (वय 27 सर्व रा.पाडले), वंदना चोगले (वय 34, रा. पाजपंढरी), सामीया इरफान शिरगांवकर अशा आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube