Download App

Sujay Vikhe : समनापूरमधील दगडफेकीवर सुजय विखेंची प्रतिक्रिया; ‘म्हणाले ही दंगल…’

Sujay Vikhe On Samanapur Stone Pelting : अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील समनापूर (Samanapur) गावात काल दोन गटात वाद झाला. या वादात काही गाड्यांच्या काचाही फोडण्यात आल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. दोन्ही गटात बाचाबाची झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, आता खासदार सुजय विखेंनी (MP Sujay Vikhe) यावर प्रतिक्रिया दिली आहे. ही दगडफेक (stone throwing) पूर्वनियोजित असल्याचा दावा त्यांनी केला आहे. (Sujay Vikhe said the stone pelting in Samnapur was pre-planned)

संगमनेरच्या समनापूर गावात काल समस्त हिंदू समाजातर्फे भगवा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अनेक हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदू समाजातील नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चानंतर परतत असतांना लोकांवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीवर भाष्य करताना खा. विखे म्हणाले की, मोर्चा शांततेत पार पडला. या मोर्चात 30-40 हजार लोक सहभागी झाले होते. या मोर्चात महिलांची संख्या अधिक होती. मोर्चा आटोपल्यानंतर शांततेने घरी जात असताना मोर्चात सामील झालेल्या नागरिकांवर दगडफेक करणे चुकीचे आहे. त्यांनी संवैधानिक मार्गाने मोर्चा काढला होता. मात्र, एका ठराविक ठिकाणी आंदोलकांनी त्यांच्यावर दगडफेक केली आणि तिथं आधीच दगड होते. त्यामुळे ही दगडफेकीची घटना पूर्वनियोजित होती असे मला वाटतं, असं विखेंनी सांगितलं.

Ganesh Sugar Factory Election: विखेंना हादरे देण्यासाठी बाळासाहेब थोरातांना कोल्हे गटाची रसद

विखे म्हणाले, पोलिसांनी धरपकड करत आहेत. मात्र, घटना कशा थांबवता येतील, या घटना नियंत्रीत कशा करता येतील, यावर पोलिसांनी भर द्यावा. स्थानिक लोकप्रतिनिंधी देखील पोलिसांना सहकार्य करावं. कुठल्याही एका गटाला सहकार्य न करता शांतता कायम राहील, याची काळजी घ्यावी. अन्यथा या घटनांचे लोण हळूहळू महाराष्ट्रभर पोहोचेल, असं सुजय विखेंनी सांगितलं.

प्रकरण काय आहे?

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे काल सकल हिंदू समाजाच्या वतीने भगवा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला प्रतिसाद म्हणून संगमनेरकरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय बंद ठेवून मोर्चाला पाठिंबा दिला. संगमनेर शहर व परिसरात उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. सर्व काही सुरळीत सुरू असताना तालुक्यातील समनापूर गावात या मोर्चाला गालबोट लागले. या मोर्चानंतर काही लोकांनी मोर्चावरून परतणाऱ्या नागरिकांवर दगडफेक केली. हिंसक गटाकडून गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली. अनेक घरांवर दगडफेकही करण्यात आली.

16 जणांना अटक

दगडफेकीच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी 16 जणांना अटक केली आहे. सध्या समनापूर गावात तणावपूर्ण शांतता आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस इतर हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

Tags

follow us