ज्यांची ताकद नाही ते लोकं देशावर कधीच राज्य करु शकत नाही, या शब्दांत कॉंग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना चिमटा काढला आहे. दरम्यान, यंदाच्या आषाढी वारी सोहळ्याला के. चंद्रशेखर राव हजेरी लावणार आहेत. यावेळी वारकऱ्यांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर शिंदे यांनी भाष्य केलंय.
दोन लाख द्या, मुंबई, पुण्यातील बॉम्बस्फोट थांबवतो; धमकीच्या फोननं खळबळ
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे सोलापुरात स्वागत त्यांना सोलापूरचे शिक कढई फार आवडेल. बीआरएससारखे पक्ष देशावर राज्य करू शकत नसल्याचे ते म्हणाले आहेत.सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी धर्मराज काडादी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते येणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह पंढरपुरात येणार आहेत.
बॉलिवूडचा ‘बाबा’ आता क्रिकेटच्या मैदानात, संजय दत्त झाला ‘या’ मोठ्या टीमचा मालक
या पार्श्वभूमीवर सुशीलकुमार शिंदे यांना विचारलं असता त्यांनी माझ्या सहीनेच तेलंगणा राज्य निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यावेळी सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री होते. त्यावेळी तेलंगणाची काय स्थिती होती हे सुद्धा मला माहित असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ज्यांची ताकद नाही ते लोकं देशावर कधीच राज्य करु शकत नसल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.
MPSC टॉपर दर्शनाच्या हत्येचं गुढ उकललं; बेपत्ता मित्र हांडोरेला मुंबईतून अटक
काही दिवसांपासून तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी विदर्भानंतर मराठवाड्यात लक्ष घातल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता के. चंद्रशेखर राव यांनी आपला मोर्चा पश्चिम महाराष्ट्राकडे वळवला आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे.
दिग्गजांनी बीआरएस पक्षात प्रवेश केल्याने राज्याच्या राजकारणात एकच चर्चा रंगली होती. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केसीआर महाराष्ट्र दौरा करीत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. आषाढी वारीच्या महासोहळ्यात सहभागी होण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव पंढरपुरात येणार आहेत. चंद्रशेखर राव यांच्यासोबत तेंलगणा सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ देखील हजेरी लावणार आहे. यासोबतच हेलिकॉप्टरमधून वारकऱ्यांवर ते पुष्पवृष्टी करणार आहेत. पंढरपूर दौऱ्यासाठी तब्बल 300 गाड्यांच्या ताफ्यातून हे मंत्रिमंडळ महाराष्ट्रात दाखल होणार आहे.