बॉलिवूडचा ‘बाबा’ आता क्रिकेटच्या मैदानात, संजय दत्त झाला ‘या’ मोठ्या टीमचा मालक

  • Written By: Published:
बॉलिवूडचा ‘बाबा’ आता क्रिकेटच्या मैदानात, संजय दत्त झाला ‘या’ मोठ्या टीमचा मालक

फ्रँचायझी क्रिकेट झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, झिम्बाब्वे ‘झिम आफ्रो टी 10’ स्पर्धेचे आयोजन करण्याच्या तयारीत आहे. ही स्पर्धा 20 जुलैपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत, बॉलीवूड अभिनेता संजय दत्त हा एरीज ग्रुप ऑफ कंपनीजचे सर सोहन रॉय यांच्यासह हरारे हरिकेन्स संघाचा सह-मालक बनला आहे.

बॉलिवूडच्या या दिग्गज अभिनेत्याचे क्रिकेट विश्वात पदार्पण आहे. झिम्बाब्वे आयोजित, या स्पर्धेत एकूण पाच संघ सहभागी होतील, ज्यामध्ये – डर्बन कलंदर, केप टाउन सॅम्प आर्मी, बुलावायो ब्रेव्ह्स, जोबर्ग लायन्स आणि हरारे हरिकेन्स असे संघ आहेत. लीगमध्ये सामील होणारा डर्बन कलंदर संघ पाकिस्तान सुपर लीग फ्रँचायझी लाहोर कलंदर फ्रँचायझीचा संघ आहे. (bollywood-actor-sanjay-dutt-bought-harare-hurricanes-cricket-team-in-zimbabwe-s-zim-afro-t10-tournament)

Zim Afro T10 हा हरारे येथे होणारा झिम्बाब्वेमधील पहिला फ्रेंचाइजी क्रिकेट स्पर्धा असेल. या स्पर्धेसाठी खेळाडूंचा मसुदा 2 जुलै रोजी हरारे येथे होणाऱ्या कार्यक्रमात होणार आहे. झिम आफ्रो स्पर्धेचा हा पहिला हंगाम असेल. त्याचवेळी, संजय दत्तने या स्पर्धेतील संघाचा सहमालक होण्याचा उत्साह व्यक्त केला आहे. यासह त्याने हरारे हरिकेन्स स्पर्धेत चांगली कामगिरी करून झिम्बाब्वेमधील क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.

Monsoon Update : आनंदाची बातमी! उद्यापासून पावसाची शक्यता, 24 जूनपासून जोर वाढणार; हवामान विभागाची माहिती

बॉलीवूड अभिनेता संजय दत्त म्हणाला, “क्रिकेट हा भारतात धर्मासारखा आहे आणि सर्वात मोठ्या क्रीडा राष्ट्रांपैकी एक आहे, मला वाटते की हा खेळ जगाच्या कानाकोपऱ्यात नेणे हे आपले कर्तव्य आहे.” तो पुढे म्हणाला, “झिम्बाब्वेचा खेळात मोठा इतिहास आहे आणि याच्याशी निगडीत राहणे आणि चाहत्यांना चांगला वेळ घालवण्यास मदत करणे ही गोष्ट मला खरोखर आनंद देते. , मी हरारे हरिकेन्सच्या जिम आफ्रो T10 मध्ये खरोखर चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube