Download App

उदयनराजे भोसले राजकारणातून निवृत्त होणार? खुद्द राजेंनीच दिले संकेत, ‘निवडणूक लढण्याची खाज…’

  • Written By: Last Updated:

Udayanraje Bhosale : साताऱ्याचे भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले आहेत. माझी निवडणूक लढवण्याची खाज होती. पण, आता निवडणुक लढण्याची खाज नाही, असं विधान त्यांनी केलं. इतकंच नाही तर राजकारणातही निवृत्तीचे (Political retirement) वय असावे, असं ते म्हणाले.

440 व्होल्टेजचा झटका देऊन बारामती जिंकू; चंद्रशेखर बावनकुळेंचे थेट सुळेंना ‘चॅलेंज’ 

आज उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक विषयावर भाष्य केलं. त्यावेळी बोलतांना उदयनराजे भोसले म्हणाले की, माझी निवडणूक लढवण्याची खाज होती, त्यात मी पन्नाशी कधी ओलांडली ते कळलेच नाही. या निवडणुकीच्या खाजेपायी कॉलेज, लग्न कधी झालं लक्षातच आलं नाही, आता माझी खाज भागली, असं म्हणत त्यांनी निवडणूक न लढण्याचे संकेत दिले.

ते म्हणाले, ज्याप्रमाणे सरकारी सेवेत असलेल्यांना निवृत्तीचे वय असते, त्याचप्रमाणे राजकारणातही निवृत्तीचे वय असावे आणि हे राजकारण्यांनाही लागू झाले पाहिजे, असं माझं वैयक्तीक मत आहे. प्रत्येकजण म्हणतं की, लोकांचा आग्रह होता म्हणून मी निवडणूक लढतो. पण हे कुठेतरी थांबायला हवं. प्रत्येकानं राजकारणातून कधी निवृत्त व्हावं, हे ठरवलं पाहिजे, असं ते म्हणाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फुट पडून अजित पवार गट सत्तेत सहभागी झालं. सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांनी पक्षावरच दावा ठोकला. इतकचं नाही तर त्यांनी आता शरद पवारांनी राजकारणातून निवृत्त व्हावं, असं म्हटलं होतं. याविषयी विचारलं असता, उदयनराजे म्हणाले की, आता शरद पवारांनी मार्गदर्शक व्हावं, हे माझं स्पष्ट मत आहे. पवार साहेबांनी सल्लागार म्हणून काम करावं, मुख्यमंत्रिपदासह सर्व पदे त्यांनी भूषवली आहेत, ते संरक्षण मंत्रीही होते. आता त्यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणं गरजेचं आहे, असं उदयनराजे म्हणाले.

गुणरत्न सदावर्तेंना त्यांच्या मालकानं समज द्यावी; मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांकडे रोख! 

सातारा नगरपालिकेने हद्दवाढ केल्यानं आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी उदयनराजेंवर साताऱ्याला लुटल्याचा आरोप केला. याबाबत बोलताना उदयनराजे म्हणाले की, सगळे सोंग आणता येतात, पण पैशांचं सोंग आणता येत नाही. सुविधा हव्यात पण घरपट्टी नको, मात्र महसूल मिळायला हवा. काही महाभाग घरपट्टी भरत नाहीत, मग सुविधा कशा मिळणार? घरपट्टीच्या अनुषंगाने टीका कऱणारे विद्वानं असावेत, पालिकेच्या कारभाराची चौकशी करणार असाल तर ईडीच्या चौकशा लावा, असं ते म्हणाले.

Tags

follow us