Download App

Cm Eknath Shinde आज अहमदनगर दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणार

अवकाळीमुळे झालेल्या नूकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आज अहमदनगर दौऱ्यावर असणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे पारनेर आणि वनकुटेमधील नूकसानग्र्सत शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन पाहणी करणार असल्याचं समजतंय.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, नगर, राहुरी, नेवासे, पाथर्डी, शेवगाव तालुक्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच कर्जत, संगमनेर आणि श्रीरामपूरमध्ये अल्प पाऊस झाला.

केजरीवालांचा ‘आप’ बनला राष्ट्रीय पक्ष, आयोगाचा अनेक दिग्गजांना धक्का

अवेळी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा अर्थिक फटका बसला असून यामुळे शेतकऱ्यांच्या धान्यपिके आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नूकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पिक अस्मानी संकटाने हिरावून घेतलं आहे.

यासोबतच धाराशिव जिल्ह्यातही मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा असून धाराशिवमधल्या धारुर, वाडी, बामणीमध्येही पाहणी करणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचे संकट ओढावलेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर होते.

ठाण्यातला गुंड अयोध्येला धुवायला नेला का? अंबादास दानवे आक्रमक

मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन विरोधकांकडून टीकेची झोड उठली होती. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा अयोध्या दौरा संपन्न झाल्यानंतर एकनाथ शिंदे राज्यात आल्यानंतर थेट नूकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत आहेत.

दरम्यान, अवकाळीमुळे झालेल्या नूकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून काहीसा दिलासा देण्यात आला आहे. राज्यात मार्च 2023 मध्ये विविध जिल्ह्यात अवेळी झालेल्या पावसामुळे शेतीपिके व इतर नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला आहे.

केंद्र सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक : राहुल गांधी प्रकरणावरुन मांडणार… 

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार आज निधी वितरणाचा शासन निर्णय देखील काढण्यात आला आहे.

मुख्यमंत्री अयोध्येत असतानाही त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांनी नूकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. अयोध्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री आता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी करीत आहेत.

Tags

follow us