ठाण्यातला गुंड अयोध्येला धुवायला नेला का? अंबादास दानवे आक्रमक

  • Written By: Published:
ठाण्यातला गुंड अयोध्येला धुवायला नेला का? अंबादास दानवे आक्रमक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदारांसोबत अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Tours) गेले होते. या अयोध्या दौऱ्यावरून शिंदे गटावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जाते आहे. सोशल मीडियावर देखील याची जोरदार चर्चा सुरु आहे.

सोशल मीडियावरच या दौऱ्यातील एका फोटोचो जोरदार चर्चा सुरु आहे. एकनाथ शिंदें यांच्या ताफ्यात इतर आमदार-खासदारांसह सिद्धेश अभंगे या ठाण्यातील एका सेना कार्यकर्त्याचा फोटो दिसतो आहे. मीडिया रिपोर्टनुसार अभंगे याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने मागील वर्षी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

बाबरी पडली तेव्हा अयोध्येत बाळासाहेब व शिवसैनिक नव्हते, चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक दावा

याच मुद्द्यावरून आता शिवसेना ठाकरे गटाकडून शिंदे यांना टार्गेट केलं जात आहे. त्यालाही पवित्र अयोध्येत धुवायला नेला होता का, असा सवाल आता शिवसेनेकडून करण्यात येत आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावरच एक ट्विट करून जोरदार टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “काय हा ‘फडतूस’पणा? अगोदर गुजरातला वॉशिंग मशीन लावून गद्दार धुतले. आता पवित्र अशा अयोध्येत मशीन लावून खून खंडणी प्रकरणातील आरोपी सिद्धेश अभंगे तेथे धुवायला नेलेला वाटतं. ते ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानातून.” याच ट्विटमध्ये त्यांनी पुढे, “देवेंद्र फडणवीस तुम्हाला आता हे चालते का? असा टोलाही लगावला आहे.

उदयनराजेंचे नाव घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्याने अजित पवारांना भरला ‘दम’

सिद्धू अभंगे याची ओळख ठाण्यातील गुंड अशी आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीच्या काही दिवस आधी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.याआधीही अनेकदा सिद्धेश अभंगेचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झाले होते. युट्यूब भाई असं त्याला संबोधलं जात होतं. खंडणी, हत्येचा प्रयत्न, धमकावणे, धारदार हत्यार बाळगणे यासारखे गुन्हे त्याच्या नावावर आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube