अहमदनगर : मला मिळालेली 4 मतं गुप्त असून त्यांचं मला मतदान झालं आहे, त्यामुळे नावं सांगू शकत नसल्याची प्रतिक्रिया जिल्हा सहकारी बॅंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी दिली आहे. जिल्हा बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत आज अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणूकीत महाविकास आघाडीचे चंद्रशेखर घुले यांचा एक मताने पराभव करत भाजपचे शिवाजी कर्डिले यांनी अध्यक्षपद भूषवलं आहे. यावेळी कर्डिलेंनी निवड होताच विजयाचं समीकरण कसं जुळलं याबद्दल भाष्य केलंय.
Sharad Pawar : माझ्या जन्माच्या तिसऱ्या दिवशीच आईने मला सभागृह दाखवलं!
कर्डिले म्हणाले, जिल्हा बॅंकेच्या सर्व संचालकांना आम्ही एक वर्षासाठी अध्यक्षपदाची मागणी केली होती. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांनी सहकारात कोणतंही राजकारण नको अशी ताकीद दिली होती. फडणवीसांपाठोपाठ नामदार राधाकृष्ण विखे यांनीही आम्हांला याबाबत स्पष्ट सांगितलं होतं.
मात्र, संचालक मंडळाकडून आमच्या विनंतीला कोणत्याही प्रकारची मान्यता न मिळाल्याने ही निवडणूक पार पडल्याचं शिवाजीराव कर्डिलेंनी सांगितलं आहे. निवडणुकीत कोणतंही राजकारण आणू नये, अशी आमची अपेक्षा होती.
धंगेकरांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी सांगितला जॉर्ज फर्नांडिस यांचा किस्सा; वाचा..
घुले परिवाराकडून याबाबत मागणीला मान्यता दिली नाही. त्यानंत निवडणुकीत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये एकूण 10 मते मला मिळाली असल्याचं शिवाजीराव कर्डिलेंनी सांगितलं तर नऊ मतं चंद्रशेखर घुले यांना मिळाली आहेत. यामध्ये एक मत बाद झाल्याने अध्यक्षपद मला मिळाल्याचं कर्डिले म्हणाले आहेत.
जिल्हा बॅंकेची निवडणूक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नामदार राधाकृष्ण विखे पाटील , खासदार सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली असून आमदार मोनिका राजळे, राम शिंदे, अंबादास पिसाळ, विवेक कोल्हे, भांगरे, अमोल राळेभात यांनी निवडणूकीत सहकार्य केल्याचंही कर्डिले सांगायला विसरले नाहीत.
अहमदनगर जिल्हा बँकेत पुन्हा पिसाळ पॅटर्न; पालकमंत्री विखेंची ताकद वाढली…
गेल्या 15 वर्षांच्या कालावधीत मला एकदा चेअरमनपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर आता माझ्यावर जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी पडली आहे. याआधीच्या लोकांनी जसा आदर्श ठेऊन काम केलं तसंच काम यापुढे केलं जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
दरम्यान, जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात घुले परिवाराचं मोठं योगदान असून जिल्हा बॅंकेसाठी घुले-कर्डिले लढत मैत्रीपूर्ण झाली असून सहकारात राजकारण नको हीच आमची भूमिका असल्याचं खासदार सुजय विखे पाटलांनी सांगितलंय.