Download App

Ahmednagar News : शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यक्षेत्रात कोणत्या तालुक्यांचा समावेश?

Ahmednagar News : सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी राज्यात शिर्डी आणि चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यात येणार असून याबाबतचा अतिशय महत्त्वाचा ठराव आज मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी‌ दिली आहे.मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर विखे पाटील यांनी ही माहिती दिली.

सीएम शिंदेंच्या ट्विटवर औरंगाबादचा उल्लेख; रोहित पवारांनी स्क्रीनशॉट शेअर करत सुनावले

जिल्हा प्रशासनाचे बळकटीकरण करण्याच्या तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी व चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मांडला. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाने एकमताने मंजूर केला आहे.

मोदी-शाह-नड्डांचे दौरे वाढले; भुजबळांनी बोटीची स्टोरी सुनावत भाजपला दिले आव्हान

शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले व राहूरी या तालुक्यांचा समावेश असणार आहे. तसेच उच्चस्तरीय सचिव समितीने सदर कार्यालयासाठी अप्पर जिल्हाधिकारी, नायब तहसीलदार व लघुलेखक (निम्नश्रेणी) अशा नव्याने निर्माण करण्यात आलेल्या प्रत्येकी एका पदास आणि एकूण तीन पदांना, तर अव्वल कारकूनचे एक पद व लिपीक टंकलेखकची दोन पदे या अतिरिक्त 3 नवीन अशा एकूण 6 पदांनाही आज मान्यता देण्यात आली.

Prabhu Deva: गो गो गो गोविंदा; वयाच्या 50 व्या वर्षी प्रभुदेवा बनला चौथ्यांदा बाप

दरम्यान, या निर्णयामुळे शिर्डी कार्यक्षेत्रातील सर्व सामान्य नागरिकांना शासकीय कामकाजासाठी स्वतंत्र अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय लवकरच उपलब्ध होणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरानंतर जिल्ह्याच्या विभाजनाची जोरदार चर्चा सुरु होती. अखेर काल राज्य सरकारने विभाजनाऐवजी शिर्डीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता जिल्हा विभाजनाचा विषय लांबणीवर जाणार असल्याचं बोललं जातंय.

Tags

follow us