Download App

जे घडलं ते महाराष्ट्राच्या हिताचं, अजित पवारांच्या शपथ विधीवर फडणवीस म्हणाले…

  • Written By: Last Updated:

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाच निशाण फडकवलं आहे. अजित पवार यांनी आज (2 जुलै) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह अन्य 9 जणांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांनी शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा दिला असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या  राज्यातच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. या घडामोडींवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रया समोर आली आहे.  (What happened is in the interest of Maharashtra, Fadnavis said on Ajit Pawar’s swearing-in ceremony…)

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी आज मुंबईतील राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले जे घडलं आहे ते महाराष्ट्राच्या हिताचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मी आणि अजित पवार आम्ही तिघे मिळुन महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ. यातून महाराष्ट्रात आम्ही एक नवीन विकासाचा अध्याय लिहु. अतिशय प्रगल्भ, पुरोगामी सरकार विकास देणार सरकार आम्ही देऊ.

Raj Thackeray : पवारांची पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !

आज सकाळपासूनच राज्यातील राजकारणात भुकंपसदृश्य स्थिती होती. NCP चे अनेक आमदार अजित पवारांसोबत सरकारमध्ये सामील होणार अशी चर्चा होती. परंतु, सरकारकडून याबाबत अधिकृत खुलासा आला नव्हता. अखेर आज दुपारी, अजित पवार हे ३० ते ४० आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी आज सकाळी त्यांच्या समर्थक आमदारांची देवगिरी बंगल्यावर बैठक घेतली. यानंतर संबंधित आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र घेऊन अजित पवार राजभवनात दाखल होते. त्यानंतर काही वेळातच अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

अजित पवार यांच्या सोबत असलेले आमदार –

दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अनुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे हे आमदार अजित पवार यांच्या आजच्या बैठकीला उपस्थित होते.

Tags

follow us