Download App

फेलोशीप घेऊन काय करणार? ‘पीएचडी घेतील ना’; दादांच्या सवालावर सतेज पाटलांचं प्रत्युत्तर

Ajit Pawar Vs Satej Patil : राज्य विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सवाल-जवाबाचं सत्र सुरु आहे. अशातच काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी फेलोशीपच्या मुद्द्यावरुन सरकारला निर्णयातत सुधारणा करण्याची मागणी केली आहे. सध्या राज्यातील बार्टी, सारथी, महाज्योती संस्थांमधून विद्यार्थ्यांना फेलोशीप देण्यात येते. मात्र, यंदाच्या वर्षीपासून राज्य सरकारने फक्त 200 विद्यार्थ्यांना फेलोशीप देण्याचा निर्णय घेतल्याने सतेज पाटलांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. त्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि आमदार सतेज पाटील यांच्यात मिश्किलपणे शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

Share Market : नफेखोरीनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; गुंतवणुकदारांचं तब्बल 1.29 लाख कोटींचं नुकसान

बार्टी, सारथी, महाज्योती संस्थेमार्फत अनेक विद्यार्थी फेलोशीप घेत असतात. राज्य सरकारकडून 29 मार्चला विद्यार्थ्यांसाठीच्या नव्या शर्ती आणि अटी घालण्यात आल्या आहेत. मात्र, त्याआधीच 1329 विद्यार्थ्यांनी फेलोशीप मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांचं नूकसान न होता त्यांना फेलोशीपचा लाभ मिळण्यात यावा, राज्य सरकारने पुढील वर्षीपासून अटींची अंमलबजावणी करावी, अशी मागणी सतेज पाटलांनी केला आहे.

ललित पाटील प्रकरणावरून ठाकरेंच्या आमदारांनी घेरलं पण, फडणवीस पुरून उरले

त्यावर बोलताना अजित पवार आणि सतेज पाटलांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अजित पवार म्हणाले, बार्टी, महाज्योती आणि सारथी संस्थांवर मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांनी फेलोशीप निधी देण्याची मागणी सातत्याने होती. एवढ्या मुलांना खरंच पीएचडी करण्याची खरंच गरज आहे काय? त्यासाठी समिती नेमून त्याचा निर्णय घ्यायचा आहे. सारथी संस्थेमार्फत पीएचडीसाठी 200 विद्यार्थ्यांची संख्या आणि परदेशात जाण्यासाठी 75 विद्यार्थी, अशी संख्या करण्यात आली असल्याचं अजित पवार यांनी स्पष् केलं आहे.

मविआ सोडून भाजपसोबत!’ठाकरेंनी मोदींना वचन दिलं होतं’; भाजप-सेना युतीच्या पडद्यामागील गोष्टी उघड

दरम्यान, फेलोशीप मिळावी, अशी मागणी केल्यानंतर अजित पवार म्हणाले, फेलोशीप घेऊन काय करणार आहेत? पीएचडी घेतील ना दादा, त्यावर दादांनीही प्रतिसवाल करीत पीएचडी करुन काय दिवा लावणार आहेत, असं प्रत्युत्तर दिलं. त्यावरही सतेज पाटलांनी असं कसं म्हणता येईल दादा,,, असं मिश्किल अंदाजात उत्तर दिलं आहे. पीएचडी धारकांची या योजनांमुळे संख्या वाढणार असून बार्टी, महाज्योती, सारथीमधून विद्यार्थ्यांना फायदाच होणार आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयावर सुधारण करण गरजेचं असल्याचं सतेज पाटलांनी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us