मविआ सोडून भाजपसोबत!’ठाकरेंनी मोदींना वचन दिलं होतं’; भाजप-सेना युतीच्या पडद्यामागील गोष्टी उघड

मविआ सोडून भाजपसोबत!’ठाकरेंनी मोदींना वचन दिलं होतं’; भाजप-सेना युतीच्या पडद्यामागील गोष्टी उघड

Deepak Kesarkar : अपात्र आमदारांप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सध्या सुनावणी सुरु आहे. या सुनावणीदरम्यान, उदय सामंतासंह दीपक केसरकरांची उलटतपासणी झाली आहे. या सुनावणीत शिवसेना पक्ष आणि हिंदुत्वाबद्दल बोलताना दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) मोठा गौप्यस्फोट केला आहे. जून 2021 मध्ये उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी सोडून भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचं वचन पंतप्रधान मोदींना दिलं असल्याचं दीपक केसरकरांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता भाजप -शिवसेनेच्या पडद्यामागील काही गोष्टी सुनावणीदरम्यान उघड होऊ लागल्या आहेत. दीपक केसरकरांच्या या दाव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.

Musafira Movie: मैत्रीची तरल भावना व्यक्त करणार ‘मुसाफिरा’ टायटल सॉन्ग रिलीज, एकदा पाहाच

दीपक केसरकर म्हणाले, उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदींमध्ये महाविकास आघाडी सरकार राज्यात असताना बंद दाराआड काही चर्चा झाल्या होत्या. त्यामध्ये महाविकास आघाडीतून बाहेर पडून युती करण्यातबाबत ठाकरेंनी मोदींना वचन दिलं होतं.

Maratha Reservation : मनोज जरांगेंना उशिरापर्यंत सभा घेणं भोवलं; आयोजकांवर गुन्हा!

8 जूनला ठाकरे काही सहकाऱ्यांसोबत दिल्लीत होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाणही तिथे होते. या तिन्ही नेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक संपली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत उद्धव ठाकरे यांची बैठक झाली होती.

कॅरमेल रॅप शर्टपासून लाइम ग्रीन जॅकेटपर्यंत साकिब सलीमचे स्टायलिश आउटफिट्स… पाहा फोटो…

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या बैठकीनंतर ठाकरेंनी मला सांगितलं की, भाजप शिवसेना युतीबाबत नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे. यासंदर्भात पंतप्रधान मोदींना कळवा. त्यानंतर मी दिल्लीपर्यंत ठाकरेंना मेसेज पोहोचवण्यासाठी व्यवस्था केली होती. दोन्ही पक्षांनी एकत्र यावं, असे बहुतांश नेत्यांना वाटतं असल्याचंही दीपक केसरकरांनी स्पष्ट केलं आहे.

‘चंदीगढ करे आशिकी’ चित्रपटाला दोन वर्ष पूर्ण! अभिषेक कपूरने शेअर केली भावनिक पोस्ट

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी खूप वेळ घेतला, त्यामुळे मी ही माहिती पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांना सांगितली. सुभाष देसाई, अनिल देसाई आणि एकनाथ शिंदेंना याबद्दल सांगितले आणि त्यांना म्हणालो की, लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी उद्धव ठाकरेंना विनंती करा, असं केसरकर यांनी उलटतपासणीत सांगितलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube