राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या फुटीनंतर आता राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण? या प्रश्नाचं उत्तर शरद पवारांनी दिलं आहे. यावेळी पवारांनी उत्तर देताच उपस्थित कार्यकर्त्यांकडून टाळ्या वाजवण्यात आल्या आहेत. आज पक्षातल्या सहकाऱ्यांनी जे काही केलंय, त्यावर दोन ते तीन दिवसांत भूमिका स्पष्ट होणार असून उद्या मुंबईत जाहीर सभा घेणार असल्याचं पवारांनी स्पष्ट केलंय.
Photo’s : अंगावर शहारे आणणारा काळाचा घाला… जीवाच्या आकांताने ते काचांवर हात मारत होते
तसेच माझा राज्यातील कार्यकर्त्यांवर आणि लोकांवर खूप विश्वास असून राजकीय पक्षांची खरी शक्ती सामान्य माणूस आणि कार्यकर्ता आहे. नाव, चिन्हावर आणि पक्षावर दावा त्यांनी सांगितला आहे. मात्र, तुमच्यात येऊन बोलण्यासाठी तर कुणी मला अडवू शकत नाही ना? असा प्रश्न शरद पवारांनी म्हटलं आहे. आगामी काळात तुम्हाला राष्ट्रवादीची नवी टीम दिसणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
Ajit pawar : शुक्रवारीच पदाचा राजीनामा दिला; बंडामागचं सत्य उघड करत अजितदादांचा गौप्यस्फोट!
“राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सहकारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाले आहेत. याचे सर्व श्रेय हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जातं”, अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली. तसेच पक्षाचा आश्वासक चेहरा कोण? प्रश्न विचारताच त्यांनी हात उंचावत ‘शरद पवार’ असं उत्तर दिलं आहे.
काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांची घुसमट होत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अजित पवार भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यावर मी बॉंडवर लिहुन देतो की मी राष्ट्रवादी सोडणार नाही, अशी भूमिका अजित पवारांनी मांडली होती.
SBI मध्ये अकाउंट आहे? तर या सुविधांचा अवश्य लाभ घ्या, जाणून घ्या मोफत काय मिळते?
शरद पवारांनी पक्षात भाकरी फिरवली अन् कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी नियुक्ती करण्यात आली. याचदरम्यान, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त केलेल्या भाषणात अजित पवारांनी मला विरोधी पक्षातून मुक्त करा आणि संघटनेत सामावून घ्या, असं स्पष्टपणे बोलून दाखवलं होतं. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदी अजित पवारांची वर्णी लागणार असल्याचं भाकीत अनेकांकडून करण्यात आलं होतं.
अखेर 6 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक बदल करण्यात येणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं होतं. तरीही अजित पवार आणि त्यांच्या सहकार्य़ांनी आज पक्षाविरोधात भूमिका घेत मंत्रिपदाची शपथ घेतल्याने राजकारणात महाभूकंपच झाल्याचं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.