मुंबई : मला अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल विधानसभेत सांगितलं. अमृता फडणवीस यांना वडिलांवरील गुन्हे खोटे असल्याचं सांगत मागे घेण्यासाठी एका तरुणीकडून ब्लॅकमेल करण्यात आल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे. कथित डिझायनर तरुणीने काही सट्टेबाज बुकींकडून आपण पैसे घेण्याबाबतचा प्लॅन सांगत तिने अमृता फडणवीसांना एक कोटी रुपयांची ऑफर दिली होती. अमृता फडणवीसांना ऑफर नाकारल्यानंतर महिलेने त्यांना ब्लॅकमेल केल्याचं फडणवीसांनी सांगितलं. या डिझाईनर महिलेबाबत तुम्हाला माहित आहे का? ही महिला अमृता फडणवीसांपर्यंत पोहोचली कशी? याबाबत सविस्तर जाणून घेऊ.
‘लोकसभेला दोनदा आपटलं आता विधानसभेतही आपटू’; राऊतांनी राणेंना डिवचले..
काही वर्षांपूर्वी कथित डिझायनर तरुणी अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आली. अनिक्षा जयसिंघानी असं या तरुणीचं नाव असून तिने आपण एक डिझायनर असल्याचं सांगत असतं. त्यानंतर माझ्याकडे सट्टेबाज बुकींकडून पैसे कमवण्याचा एक प्लॅन आहे असं सांगत तिने अमृता फडणवीसांना एक कोटी रुपये देणार असल्याचं सांगितलं. मात्र, आम्ही अशी कामं करत नसल्याचं अमृता फडणवीसांनी या तरुणीला सांगितले.
तळीरामांच्या खिशाला झटका.. दारूच्या प्रत्येक बाटलीवर दहा रुपये गोमाता अधिभार
त्यानंतर तिने फडणवीस यांना व्हिडिओ कॉल करत पाठीमागे ठेवलेल्या बॅगमध्ये पैसे असल्याचं दाखवल्याचंही फडणवीसांनी विधानसभेत सांगितलं. तसेच माझ्या वडिलांना खोट्या गुन्ह्यात अडकवलं असून देवेंद्र फडणवीसांना सांगून त्यांच्यावर दाखल असलेली गुन्हा मागे घ्या, असं तिने अमृता फडणवीसांना सांगितलं.
याकामी अमृता फडणवीसांकडून काही प्रतिसाद न मिळाल्याने अमृता फडणवीस यांनी तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. तपासाअंती या तरुणीच्या वडिलांचं नाव अनिल जयसिंघानी असून त्याच्यावर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे असल्याचं आढळून आलं.
हा जयसिंघानी वॉन्टेड असून सरकारी अधिकार्यांना धमकावणे, फसवणूक करणे आणि दिशाभूल करण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
Ahmednagar Politics : राजेंद्र नागवडेंनी श्रीगोंद्यासाठी ठोकला शड्डू
अनिक्षा जयसिंघानी ही अनिल जयसिंघानीची पत्नी असून पोलिस अधिकार्यांपासून लपून बसलेल्या तिच्या वडिलांविरुद्धचे पोलीस खटले बंद करण्यासाठी अनिक्षा अमृता फडणवीसांना सारखं ब्लॅकमेल करत असून याकामी तिने 1 कोटींची लाच देण्याची ऑफरही दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
अनिल जयसिंघानी नेमका कोण?
मुंबई क्राईम ब्रॅंचचे माजी उपायुक्त अमर जाधव यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे अनिल जयसिंघानी हे नाव पुढं आलं होतं.
जाधव यांनी अनिल जयसिंघानी यांना क्रिकेट सामन्यांदरम्यान सट्टेबाजी करण्यास भाग पाडलं होतं. त्यांच्या मुलांना आणि पत्नीला ओलिस ठेवलं होतं, असा आरोप करण्यात आला होता. मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये मला तीन दिवस बेटिंग करण्याबाबत सांगितल्याचं अनिल जयसिंघानी यांनी दावा केला.
त्यानंतर अनिल जयसिंघानीच्या नातेवाईकांनी जाधवांना एक कोटी रुपये दिल्यानंतर जयसिंघानीच्या कुटुंबाला सोडण्यात आलं होतं, असा जबाबही जयसिंघानीचा नोंदवण्यात आला. त्यानंतर जाधवांनी मला रजेवर पाठवलं अन् त्यानंतर मी स्वेच्छानिवृत्ती घेऊन पोलिस खात्यातून बाहेर पडलो, असा दावा जयसिंघानीने केला. दरम्यान, जाधव यांच्यावरील आरोपांचे पुढे काय झाले हे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलेले नाही.