Ahmednagar Politics : राजेंद्र नागवडेंनी श्रीगोंद्यासाठी ठोकला शड्डू
Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्हा काँग्रेसची (Ahmednagar Congress) जबाबदारी मिळालेले श्रीगोंद्याचे राजेंद्र नागवडे (Rajendra Nagwade) यांनी आता आगामी विधानसभेच्यादृष्टीने शड्डू ठोकला आहे. ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर लेट्सअपला दिलेल्या विशेष मुलाखतीत नागवडे यांनी श्रीगोंद्यातून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या माध्यमातून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आल्याचे नागवडे यांनी सांगितले आहे. जिल्ह्यात काँग्रेस वाढीबाबत नागवडे म्हणाले, शंभर वर्षांपेक्षा जास्त जुना काँग्रेस पक्ष आहे. मध्यंतरीच्या काही घडामोडीमुळे पक्षाचा जनाधार घटला होता. राहुल गांधी यांनी देशात काढलेल्या भारत-जोडो यात्रेमुळे जनसामान्यांमध्ये काँग्रेसबाबत विश्वास वाढला आहे. काँग्रेसमध्ये तरुणांना आणून पक्ष संघटना बळकट केले जाईल.
Sai Resort प्रकरणी अनिल परबांना तिसरा झटका!
तीन वर्षांपूर्वी भाजपमध्ये राजेंद्र नागवडे यांनी प्रवेश केला होता. त्याबाबत ते म्हणाले, काही आमचे राजकीय विरोधक हे काँग्रेसमध्ये आले होते. तो स्थानिक पातळीवर संघर्ष होता. त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यामुळे काँग्रेस सोडली होती. अन्यथा भाजपमध्ये जाण्याची आवश्यकताही नव्हती. पहिल्यापासून आम्ही काँग्रेसचे असल्याचे त्यांनी सांगितले.
Breaking! अहमदनगर छावणी मंडळाची निवडणूक अखेर रद्द; इच्छुक उमेदवारांचा हिरमोड
आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत ते म्हणाले, आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आमची शंभर टक्के तयारी आहे. त्या दृष्टीने आम्ही तयारी सुरू केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काँग्रेस-राष्ट्रवादी व ठाकरे गट असे एकत्रच लढविणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आगमी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे जास्तीत उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वासही नागवडे यांनी व्यक्त केला आहे.