Sai Resort प्रकरणी अनिल परबांना तिसरा झटका!
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी माजी परिवहन मंत्री अनिल परब यांना तिसरा झटका बसला आहे. सर्कल अधिकारी सुधीर पारबुळे यांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी अनिल परब यांचे भागीदार सदानंद कदम आणि तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना अटक करण्यात आली आहे. साई रिसॉर्ट घोटाळा प्रकरणी ही तिसरी अटक असल्याने अनिल परब यांना मोठा झटका बसला आहे.
याबाबत माजी खासदार आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी साई रिसॉर्ट प्रकरणी सातत्याने पाठपुरावा करत आहे. याविषयी किरीट सोमय्या म्हणतात की, या घोटाळ्यात बऱ्यापैकी प्रगती होत आहे. आता सर्कल अधिकारी सुधीर पारबुळे यांना दापोली पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत ही तिसरी अटक असल्याने ‘आगे आगे देखो, होता है क्या… अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Sanjay Kakade यांना दणका : कर्ज थकल्याने संपत्ती जप्त करण्याचा न्यायालयाचा आदेश
किरीट सोमय्या म्हणतात साई रिसॉर्ट घोटाळा प्रकरणी यापूर्वी अनिल परब यांचे भागीदार सदानंद कदम आणि तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांनी साई रिसॉर्टच्या कामासाठी बेकायदेशीर परवानगी दिल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असल्याने ईडीने अटक केली आहे. त्यापूर्वी काही दिवसांपूर्वीच अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना ईडीने चौकशीनंतर अटक केलेली आहे.
किरीट सोमय्या म्हणाले की, सुधीर पारबुळे यांच्यावर बिनशेती परवानगी संबंधीचा चुकीचा अहवाल बनविणे, सीआरझेड नो डेव्हलोपमेंट झोन असतानाही सीआरझेड भंग होत नाही, बोगस अहवाल देणे, खाडाखोड करणे, खोटारडेपणा करणे, खाडाखोड करून रस्ता नसताना रस्ता आहे असे दाखविणे, लिहिणे असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहे.