Rupali Chakankar : राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण गाजत असून या प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचं नाव आल्याने त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी आता या पदावर संधी कोणाला मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, या पदासाठी 5 महिला नेत्या आग्रही असून अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) घेणार आहे.
राजकीय वर्तुळात सुरु असणाऱ्या चर्चांनुसार, या पदासाठी आमदार सना मलिक (Sana Malik) , वैशाली नागवाडे (Vaishali Nagwade) , राजलक्ष्मी भोसले (Rajlakshmi Bhosale) , प्रतिभा शिंदे (Pratibha Shinde) आणि सरोज अहिरे (Saroj Ahire) यांच्या नावांची चर्चा आहे. याच पाच नावांपैकी एकाची प्रदेशाध्यपदी नियुक्ती करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कोणाला संधी देणार, याबाबत सध्या राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे.
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात (Ashok Kharat Case) रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचं नाव आल्याने विरोधकांकडून तसेच काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. या प्रकरणात विरोधकांकडून रुपाली चाकणकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात येत असल्याने रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
शेतकऱ्यांनो राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस; अलर्ट जारी, जाणून घ्या अंदाज
तर दुसरीकडे आतापर्यंत लैंगिक छळ आणि फसवणुकीचे 10 गुन्हे दाखल झालेल्या भोंदूबाबा अशोक खरातला आज पोलीस नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करणार आहे. त्याची पोलीस कोठडी आज संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
