अशोक खरात अन् महिलांच्या संबंधांचे व्हिडीओ व्हायरल करत असाल तर खबरदार! तिघांविरोधात दाखल झालाय पहिला गुन्हा
पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई सुरू असल्याची माहिती आहे.
Breach of confidentiality in sensitive matters : नाशिकमधील गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात आता आणखी एक गंभीर घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. विशेष तपास पथकाने दिलेल्या माहितीनुसार, सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून, तपासादरम्यान पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे उघड झाले आहे.
कोपरगावमधील एका व्हाट्सअँप ग्रुपवर 25 मार्च 2026 रोजी हे व्हिडिओ शेअर करण्यात आले होते. या प्रकरणात राहुल गंगाधर शिंदे याने सगळ्यात पहिले हे व्हिडिओ व्हायरल केल्याचे समोर आले आहे. तपासात पुढे असे देखील निष्पन्न झाले की, पंढरीनाथ आढाव याने राहुल शिंदे याला हे व्हिडिओ पाठवले होते, तर संदीप गर्जे याने देखील योगेश आढावला हे व्हिडिओ पाठवले होते.
या संपूर्ण साखळीचा तपास लार्त पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 147/2026 नातंर्गत बीएनएस कलम 294 (2), 3(5) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 67 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यापैकी राहुल शिंदे आणि योगेश आढाव यांना पोलिसांनी अटक केली असून, तिसरा आरोपी संदिप गर्जे सध्या फरार आहे. त्याचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ट्रान्सजेंडरसोबतचा कथित व्हिडिओ, मंत्री झिरवाळ वादाच्या भोवऱ्यात, काँग्रेसकडून राजीनाम्याची मागणी
हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि गंभीर असल्यामुळे तपास पथक अत्यंत गोपनीयतेने तपास करत आहे. या प्रकरणात आणखी महिलाही पीडित असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, विशेष तपास पथकाने सर्व नागरिक, न्यूज चॅनल्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि ग्रुप अॅडमिन्सना कठोर इशारा दिला आहे. पीडित महिलेची ओळख उघड करणारे किंवा अश्लील व्हिडीओ शेअर करणाऱ्यांविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच, कोणाकडे असे व्हिडीओ असल्यास ते तात्काळ डिलीट करण्याचे आणि पुढे प्रसारित न करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात आता पोलिसांचा कडक बडगा उचलला जात असून, या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.