शेतकऱ्यांनो राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस; अलर्ट जारी, जाणून घ्या अंदाज
Maharashtra Rain Alert : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra Rain Alert : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील काही दिवस होणाऱ्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना सर्तक राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक भागात मार्च 30 नंतर हवामानात बदल होण्यास सुरुवात होणार आहे.
या बदलामुळे मराठवाडा (Marathwada) , विदर्भ (Vidarbha) आणि खानदेशमधील (Khandesh) काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 1 एप्रिल ते 4 एप्रिल दरम्यान विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
राज्यात सध्या रब्बी पिकांची काढणी सुरु असल्याने पुढील काही दिवसात होणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून किंवा झाकून ठेवावी, हवामानाच्या स्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करावी असे आवाहन हवामान विभाग (IMD Alert) आणि कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
‘या’ 6 राशींसाठी आजचा दिवस असणार शानदार; होणार फायदा
गेल्या काही दिवसांपूर्वी देखील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या अंदाजानुसार कामे नियोजित करावी आणि काढलेली रब्बी पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावी असे आवाहन आता कृषी आणि हवामान विभागाकडून करण्यात येत आहे. तसेच मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन देखील करण्यात आले आहे.