Praful Patel : राज्यातील राजकारण सध्या आरक्षणावरून चांगलेच तापले आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) ओबीसीमधून (OBC) मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करत आहे तर दुसरीकडे लक्ष्मण हाके (Laxman Hake) देखील ओबीसी आरक्षणाला धक्का लागून नये यासाठी आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी मोठी घोषणा केली आहे.
जर आरक्षणाला धक्का लागला तर मी राजकारणातून शंभर टक्के संन्यास घेणार, कारण त्यावेळी मला कुठल्याही पदावर आणि राजकारणात राहण्याचा कोणताही अर्थ नाही म्हणून मी त्याग करेल असं प्रफुल पटेल म्हणाले. तसेच बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानात या देशाला आरक्षण देण्यात आला आहे. त्यामुळे आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही. त्याचा मूळ ढाचा कोणीही बदलू शकत नाही. असं खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले. ते गोंदिया येथे पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळाला पाहिजे. यावर आमचे सरकार ठाम आहे. त्या दृष्टीने विधानसभेत विधेयक पारित झाला आणि कायदा पण बनला आणि आम्ही दहा टक्के आरक्षण दिले. मात्र आता ज्यांना ते पटत नाही ते याचा विरोध करत आहे. काँग्रेस आणि इतर पक्ष अनेक वर्ष सत्तेत राहिले आहेत. मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न कालचा, आजचा नाही, तो फार जुना आहे. असं यावेळी प्रफुल पटेल म्हणाले.
गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाचे खंबीर नेतृत्व राज्यात राहिले आहे किंबहुना अनेक पक्षात राहिलेले आहेत. मात्र त्यांनी आजपर्यंत आरक्षण दिलं नाही. पण आज आरक्षणाच्या मुद्द्यावर फक्त टीका करण्याचे काम ते करत आहे कारण ते स्वतः देऊ शकले नाही. असेही प्रफुल पटेल म्हणाले.
तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार येणार आहे. निवडणुकीत तिन्ही पक्ष महायुती म्हणून काम करणार आहे. तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकं इकडे तिकडे जातात असं प्रफुल पटेल म्हणाले.
Paris Olympics 2024 : मनू भाकरने केली कमाल, भारताला मिळणार ‘या’ इव्हेंटमध्ये पहिलं पदक
बाबाजानी दुर्राणींची शरद पवार गटात प्रवेश केल्याने यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देत प्रफुल्ल पटेल म्हणाले, पूर्वीपासून बाबाजानी आमचे सहकारी होते. आता विधानसभा निवडणूक आली आहे त्यामुळे लोकं इकडे तिकडे जात असतात. त्यांना विधानपरिषदची सीटिंग जागा परत पाहिजे होते मात्र आम्ही दुसऱ्याला संधी देत होते.आमच्याकडून सगळ्यांना शुभेच्छा. असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी बाबाजानी दुर्राणींवर केलं.