Download App

मोठी बातमी! मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला अटक

Jaykumar Gore : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार सातारा पोलिसांनी मंत्री गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक केली आहे. 

  • Written By: Last Updated:

Jaykumar Gore : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार सातारा पोलिसांनी पंचायतराज आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर (Jaykumar Gore) आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक केली आहे. सातारा पोलिसांनी महिलेला 1 कोटींची खंडणी स्वीकारताना अटक केली आहे. माहितीनुसार, प्रकरण मिटवण्यासाठी महिलेने 3 कोटींची मागणी केली होती. त्यापैकी 1 कोटींची खंडणी स्वीकारताना महिलेला सातारा पोलिसांनी अटक केली आहे.

सातारा स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत मंत्री गोरेंवर आरोप करणाऱ्या माहिलेला अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या महिलेने मंत्री गोरेंवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर सभागृहात मंत्री गोरेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. मात्र आता याच महिलेने प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केली होती आणि त्यापैकी 1 कोटींची खंडणी स्वीकारताना सातारा स्थानिक गुन्हे शाखेने महिलेला रंगेहात पकडलं आहे. माहितीनुसार सध्या महिला सातारा पोलिसांच्या ताब्यात असून पोलिसांकडून महिलेची कसून चौकशी करण्यात येत आहे.

‘या’ 5 मुस्लिम देशातून भारताला मिळतो भरपूर पैसा, RBI ने आकडाच समोर आणला

प्रकरण काय? 

जयकुमार गोरे यांनी 2017 मध्ये मानसिक त्रास देण्यासाठी स्वतःचे नग्न फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवले असा आरोप या महिलेने केला होता. या प्रकरणात गोरे यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्याता आला होता. मात्र 2019 मध्ये या प्रकरणात न्यायालयाने निकाल देत गोरे यांना निर्दोष मुक्त करत जप्त केलेला मुद्देमाल आणि मोबाईल नष्ट करण्याचे आदेश गोरे यांना न्यायालयाने दिले होते.

मोठी बातमी! 1 एप्रिलपासून ‘या’ मोबाईल नंबरवर बंद होणार Google Pay, PhonePe, जाणून घ्या सर्वकाही

follow us