Download App

चिंता वाढली, तापाने मुंबई फणफणली

  • Written By: Last Updated:

मुंबई : राज्यात विशेषता मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात ताप आणि खोकल्याची मोठी साथ आली आहे. ताप कमी झाला तरी खोकून खोकुन रुग्ण घायाळ झोले आहेत. देशातील हरियाणा, कर्नाटकामध्ये H3N2 विषाणूची रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंतेत भर घातली आहे.

नवी मुंबई मधील वैभव पाटील, हा गेले चार दिवस तापाने फणफणतोय. 104 च्या पुढे जाणारा ताप, न थांबणारा खोकला, पोटदुखी आणि उलटी अशी लक्षण त्याला दिसू लागली. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याने औषधी घेतली. ताप कमी होतो. पण खोखला थांबत नसल्यांचे वैभव चे म्हणणं आहे.

जशी वैभव ची अवस्था आहे. तशीच त्याच्या वडिलांची देखील अवस्था आहे. वडिलांही तापाची लागण झाली आहे. वैभव च्या कुटुंबाप्रमाणे मुंबई ठाण्यात आणेक कुटुंबात दोन पेक्षा अनेक सदस्य या व्हायरल फिवर ने आजारी पडले आहेत. या सर्वांमध्ये लहान मुलांचा समावेश मोठा प्रमाणात आहे. ताप, उलटी पोटदुखी ही नवी लक्षणे लहान मुलांमध्ये दिसून आली आहेत, असे डॉक्टर अदनान इनामदार यांनी सांगितले.

मुंबई, ठाण्यासह राज्यातल्या अनेक भागात हीच अवस्था आहे. त्यात देशात H3N2 चा सापडलेला रुग्ण आणि राज्यात करोनांची वाढती रुग्णसंख्या डोकेदुखी बनत चालली आहे,
सुषमा अंधारेंनी केली सोमय्यांची पोलखोल; सोमय्यांनी त्रास दिलेल्या नेत्यांची यादीच वाचली 

राज्यात कोरोना आणि वाढत्या तापाची साथ पाहता प्रशासन सतर्क झाल आहे. तात्काळ तपासणी तसेच विमान तळावर कोरोना चाचणी पुन्हा सुरु करण्यात आली आहे. घराबाहेर जाताना तोंडावर मास्क वापरावा असे आवाहन प्रशासनकडून करण्यात आले आहे.

Tags

follow us