Wrestler Sagar Moholkar, who was stabbed in the ear by Nilesh Ghaywal, dies during treatment : 13 दिवसांपूर्वी अहिल्यानगरच्या जामखेड येथे कुख्यात गुंड पैलवान सागर मोहोळकर यांच्यावर गुंडांनी गोळीबार केला होता. त्यानंतर पुण्यातील ससून रूग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मोहोळकर याने काही दिवसांपूर्वी पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळच्या कानफाटात लगावली होती.
Rahuri By Election: तनपुरे ठाम तर मी ही स्पर्धेत; सुजय विखेंचा सूर बदलला
गेल्या 13 दिवसांपासून सागर मोहोळकर हा मृत्यूशी झुंज देत होता. अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये पैलवान सागर मोहोळकर याच्यावर गोळीबार झाल्याची घटना 9 मार्च रोजी घडली होती. त्याच्या तोंडातही गोळी लागल्याची माहिती होती. त्याच्यावर जवळून गोळीबार करण्यात आला होता. त्याच्या शरीरात सहा गोळ्या लागल्या होत्या.
सागरला उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले. घटनेचा तपास पोलीस पथकाने सुरू केला व तातडीने तपासाचे चक्र फिरवले. अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जामखेड येथील अभिमन्यू याला ताब्यात घेऊन चौकशी केली. यामध्ये गोळीबार करणाऱ्या पुणे येथील चार्ली उर्फ माऊली उर्फ ज्ञानेश्वर साठे, रोहित विठ्ठल आखाडे, चिन्या या आरोपींनी गोळीबार केल्याची माहिती असून यामध्ये दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मोहोळकरवर अनेक गंभीर गुन्हे दाखल
नगरच्या जामखेड शहरात पैलवान सागर मोहोळकर याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी जखमीला उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केलं होतं. या घटनेचा तपास सुरू केला होता. सागर मोहळकर याने कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या कानाखाली मारल्याची घटना धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात एका जत्रेदरम्यान घडली होती. तेव्हापासून सागर मोहोळकर हा चांगलाच चर्चेत आला होता. तसेच त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्यानुसार नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता.
