Abu Azmi praised Aurangzeb Protection from arrest : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी एक धक्कादायक विधान केलं होतं. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, अशी स्तुतीसुमनं आझमींनी उधळली. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात धर्माची लढाई नव्हती, असंही ते म्हणाले होते. त्यानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. त्यानंतर आझमी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये त्यांनी अटकपूर्वक जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज कोर्टाने स्वीकारला आहे. त्यांना 20000 रुपयांच्या बॉण्डवर अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे. तसेच त्यांना 12, 13 आणि 15 मार्चला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
PM मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान… हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय
आझमी म्हणाले होते की, या वक्तव्यानंतर आपल्याला जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यासाठी मी आता पोलीस प्रोटेक्शन साठी अर्ज करणार आहे. आता या दरम्यान माझ्या जीवाला काहीच झाले तर त्याला सरकार जबाबदार असेल असेही यावेळी म्हणाले. मला या अधिवेशनांमधून निलंबित करण्यात आलं आहे. मात्र मी केलेलं विधान सभागृहात केलेलं विधान नव्हतं. तसेच मी कोणत्याही महापुरुषाचा अपमान केला नाही. अशाच प्रकारची कारवाई राहुल सोलापूरकर किंवा प्रशांत कोरटकर यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. असंही ते म्हणाले.
घोषणा अन् थापांभोवती फिरणारा अर्थसंकल्प; कवितेतून दानवेंनी काढले वाभाडे
दरम्यान सर्व स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर आझमी यांचा सूर नरमला होता. त्यांनी त्यांच्या एक्स या सोशलमिडीया साईटवर आपलं वक्तव्य मागे घेतलं असल्याचं सांगितलं होतं. तसेच ते म्हणाले की, माझ्या वक्तवायचा अपभ्रंश करण्यात आला आहे. त्याचबरोबर ते म्हणाले की, औरंगजेब रहमतुल्लाह आलेह यांच्याबद्दल मी तेच बोललो. जे इतिहासकार आणि लेखकांनी सांगितलं होतं.
विधान परिषदेसाठी माधव भंडारींसह भाजपची तीन नावं दिल्लीत; शिंदे-अजित पवारांना एक-एक जागा
तसेच मी छत्रपती शिवाजी महाराज , संभाजी महाराज किंवा इतर कोणत्याही महापुरुषांबद्दल अपमानकारक वक्तव्य केलं नाही. मात्र माझ्या या वक्तव्याचा कुणाला त्रास झाला असेल तर मी माझं वक्तव्य परत घेतो. तसेच माझ्या या वक्तव्याला राजकीय मुद्दा बनवण्यात आला आहे. ज्याचा वापर महाराष्ट्र विधानसभा सभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बंद करण्यासाठी होत आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचे नुकसान होत आहे. असंही ते म्हणाले होते.
आझमींनी औरंगजेबाबद्दल केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले होते. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी अबू आझमींवर घणाघाती टीका केली. सभागृहात प्रचंड गदारोळ घातला. यानंतर अधिवेशन संपेपर्यंत आमदार अबू आझमी यांना निलंबित करण्यात आले. यानंतर विधानपरिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अबू आझमीला शंभर टक्के तुरुंगात टाकू असा इशारा दिला होता.