Download App

सेटल होणारे मुख्यमंत्री कार्यालयात बसलेत, मातोश्रीवर नाहीत; आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप

  • Written By: Last Updated:

मुंबई : मुंबई महापालिकेचे (BMC) रस्ते व कंत्राटदारावरून पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आक्रमक झालेत. मुंबईतील रस्ते प्रश्नावर आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी एक गंभीर आरोप केलाय. मला कंत्राटदारांचे निरोप आले होते. परंतु मी गेलो नाही. कारण सेटल होणारे मुख्यमंत्री कार्यालयात बसले आहेत, मातोश्रीवर नाहीत असा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

अजित पवार गटाला कोर्टाचे अभय? प्रफुल्ल पटेलांचा दावा आव्हाडांनी अर्ध्या तासात निकाली काढला

आदित्य ठाकरे म्हणाले; गेल्या दीड वर्षांपासून मुंबई, राज्यात मोठे घोटाळे होत आहेत. रस्ते, फर्निचरमध्ये घोटाळे होत आहेत. या घोटाळ्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. लोकांनी ती दिलेले नाहीत. माझा लढा कंत्राटदाराविरोधात नाही. त्यामुळे मी कुणाचेही नाव घेणार नाही. मुंबईतील रस्त्याबाबत आवाज उठवत असताना काही कंत्राटदारांचे फोन आले. मला भेटायला बोलविले. पण मी गेलो नाही. कारण सेटल होणारे मुख्यमंत्री कार्यालयात बसले आहेत. मातोश्रीवर नाहीत. त्यामुळे हे सरकार बरखास्त झाल्यानंतर या लोकांना जेलमध्ये पाठवू, असा इशाराही ठाकरे यांनी दिला आहे.

…तर आम्ही पुन्हा सरन्यायाधीशांकडे जाऊ; नार्वेकरांना आदित्य ठाकरेंचा इशारा!

रेल्वेचे सर्व कारशेड हे कंजुरमार्ग येथे झाले असते. परंतु आता चार कारशेड ठाण्यात येणार आहेत. एका कारशेडसाठी साडेचार हजार कोटी रुपयांचा खर्च आहे. त्यामुळे कांजुरमार्ग येथील उर्वरित जमिनही बिल्डर मित्रांच्या घशात घालणार आहात का ? असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. ठाण्यातही कारशेडसाठी जमिनी विकत घेतल्या जाणार आहेत. या जमिनी नेमकी कुणाच्या आहेत हे मुख्यमंत्री यांनी सांगावे, असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

हा सत्याचा विजय-आदित्य ठाकरे
दोन दिवसांतील मुंबईतील घडामोडी फार महत्त्वाच्या आहेत. कारण दोन्हीतून सत्याचा मोठा विजय झाला आहे. कारण कंजुरमार्ग येथेच मेट्रोलाइन सहाचे कारशेड डेपो होणार आहेत. कांजुरमार्ग येथे आरेत आणि त्यानंतर पुन्हा कांजुरमार्ग असा हा प्रवास झाला आहे. आमचा हेतू आरेचे जंगल वाचविणे हाच होता. आता कांजुरमार्ग येथेच सर्व कारशेड होणे आवश्यक आहेत. काही कारशेड ठाण्याला नेऊन उपयोग नाही. त्यातून आणखी खर्च वाढले, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Tags

follow us