Download App

Ajit Pawar यांच्या अडचणीत वाढ; शिखर बँक घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या रिपोर्टला ईडीचा विरोध

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कारण शिखर बँक (महाराष्ट्र राज्य सहकारी बँक) घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्ट विरोधात ईडीने हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. अजित पवार भाजपसोबत असताना देखील ईडीने घेतलेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

‘महिला कार्यकर्त्यांच्या आडून माझ्यावर हल्ल्याचा डाव’; जरांगे पाटलांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

शिखर बॅंक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्ट विरोधात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यासाठी आता ईडीकडून न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. मात्र अध्याप न्यायालयाने केलेला ही परवानगी दिलेली नाही त्यावर 15 मार्चला पुढील सुनावणी सुरू होणार आहे. त्यामुळे जर न्यायालयाने ईडीला हस्तक्षेप करण्याची परवानगी दिली तर या प्रकरणी ईडीकडून युक्तिवाद केला जाऊ शकतो. कारण मुंबई पोलिसांच्या मूळ एफआरआयमध्ये अजित पवार आणि इतर नेत्यांचे आरोपी म्हणून नाव होते. यामध्ये जवळपास 25 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे.

Randhurandhar : मराठा योद्ध्यांच्या उदयाची गाथा सांगणाऱ्या ‘रणधुरंधर’ चित्रपटाची घोषणा!

मात्र प्रकरणी पोलिसांना कुठलेही पुरावे उपलब्ध होत नसल्याचे कारण देत दोन वेळा क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला. पहिला रिपोर्ट मध्ये पुन्हा तपास करण्यासाठी रिपोर्ट दाखल करण्यात आला तर दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केल्यानंतर ईडीने यावर हस्तक्षेप याचिका दाखल केले आहे. त्यामुळे आता या प्रकरणी पंधरा वर्षाला नेमकं काय त्यामुळे आता या प्रकरणी 15 मार्चला नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे अजित पवार भाजपसोबत असताना देखील ईडीने घेतलेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

follow us