‘महिला कार्यकर्त्यांच्या आडून माझ्यावर हल्ल्याचा डाव’; जरांगे पाटलांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

‘महिला कार्यकर्त्यांच्या आडून माझ्यावर हल्ल्याचा डाव’; जरांगे पाटलांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

Manoj Jarange Patil Serious Allegations on Devendra Fadnavis : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) आता राज्यात संवाद दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यावर रवाना होण्याआधी जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. भारतीय जनता पार्टीच्या महिलांना पाठवून माझ्यावर हल्ला करण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न होता. मात्र त्यांचा तो डाव फसला असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी यावेळी केला.

Manoj Jarange : ‘मला अटक तर करू द्या, लाट काय असते ते कळेल’ जरांगेंचा रोखठोक इशारा

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर हल्ला करण्याचा डाव आहे. हा प्रयोग छत्रपती संभाजीनगर येथून होणार होता. महिला कार्यकर्त्यांच्या आडून या दर्जाला जाणे गृहमंत्र्यांना शोभत नाही. दवाखान्यात अॅडमिट असल्यावर चौकशी होत नाही. मी दवाखान्याबाहेर आलो. मी मुद्दाम एसआयटीच्या चौकशीसाठी बाहेर आलो, असे जरांगे पाटील म्हणाले.

फडणवीस यांच्यात मराठा समाजाविषयी द्वेष ठासून भरलेला आहे. आताही त्यांच्याच सांगण्यावरून बोर्ड काढले जात आहेत. बोर्ड काढले त्यात गोळ्या घाला लिहिले आहे का, असा सवाल जरांगे यांनी विचारला. गृहमंत्रीच पोलिसांचे कान फुंकत आहेत. आमच्यामागे तुतारी आहे म्हणता आधी यांनी उद्धव ठाकरेंचंही नाव घेतलं होतं. आताच्या निवडणुकीत एकट्या बीड जिल्ह्यात तब्बल 3400 उमेदवार उभे राहणार आहेत. मग काय डांबरी रस्त्यावर बॅलेट पेपर अंथरणार का, असाही सवाल जरांगे पाटील यांनी केला. लावा आता कसे आमच्या दारात येऊन निवडणुकीचे पॅम्प्लेट चिटकवता तेच पाहतो, असा इशाराही त्यांनी दिला.

Manoj Jarange : आरक्षण देताच फडणवीस सदावर्तेला याचिका दाखल करायला लावणार; डिस्चार्ज मिळताच जरांगे आक्रमक

मराठ्यांवर कशा प्रकारे अन्याय होत आहे याच मेल उद्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपतींना पाठवा. कोणत्याही नेत्यांनी आमच्या दारात यायचं नाही. नेत्यांसाठी आमचे दरवाजे आता बंद असतील. माझी भूमिका काही राजकीय नाही. समाज हाच माझा मालक आहे, असेही जरांगे पाटील म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube